शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परफॉर्मन्स सुधारा अन्यथा मंडळ, सेल बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:27 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे.

ठळक मुद्देभाजप अध्यक्षांचा इशारा : महिनाभराचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. याची जाणीव ठेवून पक्षाच्या आघाड्या व सेलच्या पदाधिकाºयांनी कामाला गती दिली पाहिजे. जे काम करणार नाहीत, महिनाभरात परफॉर्मन्स सुधारणार नाहीत त्या आघाड्या व सेल बरखास्त करून नव्याने नियुक्ती केली जाईल, असा इशारा शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिला.शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी भाजपाच्या विविध २२ आघाडी व सेलचे अध्यक्ष, महामंत्री यांची बैठक घेतली. यावेळी महामंत्री संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटनमंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते. या बैठकीत आघाडी व सेलने गेल्या सहा महिन्यात कोणकोणती कामे केली, याचा आढावा घेतला. काही आघाडीचे अध्यक्ष केलेल्या कामाची माहिती व्यवस्थित सांगू शकले नाहीत तर काही बनवाबनवी करीत असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत कोहळे यांनी संबंधितांना ताकीद दिली.कोहळे म्हणाले, काही लोक फक्त पदे घेऊन घरी बसले आहेत. त्यांची आघाडी फक्त कागदावरच सुरू आहे. आता तसे होणार नाही. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. प्रत्येकाला पक्षासाठी आपले योगदान द्यायचे आहे. प्रत्येकाने केलेल्या कामाचा लेखाजोखा पक्षातर्फे ठेवला जात आहे. त्यामुळे आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही, असे कुणी समजण्याचे कारण नाही. पदाधिकारी निष्क्रिय झाले आहेत, असे निदर्शनास आले तर पद काढून घेऊन आघाडी बरखास्त करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.आघाड्यांना साप्ताहिक बैठक सक्तीची- प्रत्येक आघाडी व सेलची शहरस्तरावर साप्ताहिक बैठक घेतली जावी. या बैठकीचा अहवाल शहर कार्यालयाकडे सादर करावा. प्रत्येक आघाडी व सेलने मंडळ तसेच प्रभागस्तरापर्यंत रचना करावी. यासाठी सक्षम कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती करावी; सोबत प्रत्येक आघाडी व सेल सोशल मीडियावर सक्रिय असावा. पक्षातर्फे राबविण्यात असलेले उपक्रम व सरकारतर्फे केली जात असलेली कामे याचा प्रचार-प्रसार करण्यात आघाड्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.