भाजप : दिघोरीत प्रचार रॅलीनागपूर : लोकाभिमुख कार्य करणे हा आपला धर्म आहे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तयार असतो. जनतेच्या समस्येची जाणीव असणाऱ्या आणि जनतेच्या समस्यावर तोडगा काढण्याची जिद्द बाळगणाऱ्या उमेदवाराला संधी द्यावी, असे आवाहन दक्षिण नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपल्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून जनतेला केले. शनिवारी सकाळी दिघोरी परिसरात आणि दुपारी जानकीनगर परिसरात सुधाकर कोहळे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या माध्यमातून वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी जनतेशी थेट संपर्क साधला. नगरसेवक म्हणून प्रभागात केलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. या रॅलीत बनवारीलाल पुरोहित, डॉ. रवींद्र भोयर, कैलाश चुटे, बळवंत जिचकार, नगरसेवक रमेश सिंगारे, निताताई ठाकरे, सतीश होले, रिता मुळे, दिव्या धुरडे, स्वाती आखतकर, विजय आसोले, अनिल लांबाडे, संजू आखतकर, नागो गाणार, संजय ठाकरे, परशु ठाकूर, जमाल सिद्धीकी, कल्पना पांडे, अशोक मानकर, शंकर भोयर, पीयूष भोयर, मंगला मस्के, संघपाल काळे, नितीन शाहू, बाबाभाई यांच्यासह सर्व प्रभागातील अध्यक्ष व महामंत्री सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
जनतेच्या समस्यांची जाणीव असावी
By admin | Updated: October 12, 2014 01:18 IST