शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांच्या वस्तीत मजुरांना मिळेना घोटभर पाणी

By admin | Updated: April 13, 2017 02:57 IST

पाण्याला धर्म मानणारा देश आपला. तहानलेल्याला घोटभर पाणी देणे, हे आपल्या येथे पुण्याचे काम समजले जाते.

स्मार्ट सिटीत काम करणाऱ्या मजुरांची व्यथा : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण मंगेश व्यवहारे   नागपूर पाण्याला धर्म मानणारा देश आपला. तहानलेल्याला घोटभर पाणी देणे, हे आपल्या येथे पुण्याचे काम समजले जाते. परंतु बदलत्या काळासोबत ही पुण्याची भावनाही बदलत चालल्याची प्रचिती आपल्या नागपुरातही यायला लागली आहे. शहराला स्मार्ट करण्यासाठी शरीर होरपळून टाकणाऱ्या या प्रखर उन्हात सध्या शेकडो मजूर राबत आहेत. परंतु श्रीमंतांच्या या वस्तीला आपल्या परिश्रमाने सजवणारे हे मजूर घोटभर पाण्यालाही महाग झाले आहेत. या मजुरांची अर्धनग्न लेकरे पाण्यासाठी दारोदार भटकत असताना एसी, कूलरच्या गारव्यात वामकुक्षी घेणारे कुणीही दार उघडून त्यांना दोन घोट पाणी द्यायला तयार नाही. नागपूर शहराला स्मार्ट सिटीचा लूक देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शहरभर भरपूर विकास कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी परराज्यातील मजूर मोठ्या संख्येने नागपुरात आले आहेत. ४३ डिग्री तापमानात त्यांची अंगमेहनत सुरू आहे. अशात घशाला कोरड पडली की ते पाणी शोधतात, पण प्यायला पाणी मिळत नाही. एखाद्याने दिलेच तर चेहऱ्यावर त्रासिक भाव असतात. त्याचा तो त्रासिक चेहरा पाहून पुन्हा त्याच्या दारात जाण्याला या मजुरांचा स्वाभिमान परवानगी देत नाही. अबोल प्राणी-पक्ष्यांसाठी आपल्या अंगणात पाणी ठेवा, असे सोशल मीडियावर आवाहन करणाऱ्या आपल्या सभोवतालच्या तथाकथित समाजसेवकांना या बोलक्या मानवप्राण्यांची तहान कशी जाणवत नसेल, प्रश्नच आहे. हे सर्व मजूर शहरातील अनेक भागात रस्त्याचे सिमेंटीकरण, मेट्रोचे, फायबर आॅप्टिकसाठी नाल्या खोदण्याचे काम करीत आहेत. यातील बहुतांश मजूर हे परराज्यातील आहेत. अंगमेहनतीचे काम करीत असताना त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा बरसतात, घशाला कोरड पडते; पण फ्लॅट्स, बंगल्यांची दारे कडेकोट लागलेली. पिण्याचे पाणी मागायला जायचे तर कुठे, असा प्रश्न मजुरांना त्रस्त करीत आहे. कि मान एवढे करा नागपूरच्या विकासात आपला घाम ओतत असताना, नागपूरकरांना त्यांची व्यथा समजायला हवी. अनेकजण पशुपक्ष्यांसाठी जसे घराबाहेर पाण्याची सोय करतात. तशीच काहीशी सोय ज्या भागात मजुरांचे काम सुरू आहे, तिथे उपलब्ध करून द्यावी. त्यांना फ्रीजचे गार पाणी नको. तहान भागविण्यासाठी सार्वजनिक नळाचे पाणीसुद्धा त्यांना चालेल. अंगमेहनतीमुळे त्यांच्या गळ्याची कोरड सुटावी, त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांची पाण्यासाठी ओरड थांबावी, एवढीच अपेक्षा.