लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नरेंद्र मोदींमुळे देशाचा जगात मान वाढला आहे. येत्या २३ तारखेला रालोआचाच विजय निश्चित आहे. देशाने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. एक्झिट पोल्सचे निकाल हे अंतिम निर्णय नसून सूचक असतात असे मत नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभिनेते विवेक ओबेराय व अन्य उपस्थित होते.मोठ्या लोकांच्या हाताने चांगल्या कामाची सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून मोदी चित्रपटाच्या पोस्टरचे त्यांच्या हस्ते विमोचन करत आहे. संबंध कसे निभवावे हे गडकरी यांच्याकडून शिकले पाहिजे. मोदी आणि गडकरी हे कर्मयोगी आहेत. आमच्या भाषेत ते देशातील अॅक्शन हिरो आहेत. ते कशाची कामना करत नाहीत, केवळ काम करतात. मागील ५ वर्षात देश खूप बदलला आहे. आता देशात बापाचे नाव नाही तर काम चालेल. परत मोदी सरकारच येणार असे मत विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केले.मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. माझे मंत्रिपद पंतप्रधान ठरवतील असेही गडकरी यांनी पुढे नमूद केले.
देशातील जनतेचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:02 IST
नरेंद्र मोदींमुळे देशाचा जगात मान वाढला आहे. येत्या २३ तारखेला रालोआचाच विजय निश्चित आहे. देशाने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. एक्झिट पोल्सचे निकाल हे अंतिम निर्णय नसून सूचक असतात असे मत नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
देशातील जनतेचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास
ठळक मुद्देमी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही