शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पादचाºयांसाठी सीताबर्डीत फूटपाथवर दोर बांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:26 IST

सीताबर्डी परिसरातील मोरभवन बसस्थानक ते इंटरनिटी मॉल दरम्यानच्या फूटपाथवर हॉकर्सचे अतिक्रमण असल्याने पादचाºयांना फू टपाथवरून चालता येत नाही.

ठळक मुद्देहॉकर्सचे अतिक्रमण हटविले : व्हेरायटी चौक ते झाशी राणी चौक परिसरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी परिसरातील मोरभवन बसस्थानक ते इंटरनिटी मॉल दरम्यानच्या फूटपाथवर हॉकर्सचे अतिक्रमण असल्याने पादचाºयांना फू टपाथवरून चालता येत नाही. वाहतुकीला अडथळा होतो. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी सोमवारी येथील अतिक्रमण हटवून पादचाºयांना फूटपाथचा वापर करता यावा यासाठी या दरम्यानच्या फूटपाथवर दोर बांधला.अतिक्रमण कारवाईनंतरही हॉकर्स अतिक्रमण करतात. यामुळे नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. फूटपाथवर चपला, बॅग व अन्य साहित्याची विक्री करणाºयांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. वाहनांची वर्दळ व बसस्थानकातून निघणाºया बसेस व आॅटोचालकांची गर्दी यामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने पोलिसांनी फूटपाथ मोकळा केला आहे.तसेच झाशी राणी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गावर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. परंतु मातृसेवा संघ ते हिंदी मोरभवन या दरम्यानच्या फूटपाथवर कपडे विक्रेत्यांचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही.नागरिकांची गैरसोय होत असल्याने पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांच्या निर्देशानुसार वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांच्या निगराणीखाली वाहतूक विभागाच्या पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.अतिक्र्रमण हटविल्यानंतर पोलिसांनी मोरभवन ते इंटरनिटी मॉल या दरम्यानच्या फूटपाथवर दोर बांधला. दोराच्या आतील भागाने चालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.पादचाºयांनी फूटपाथचा वापर करावाफूटपाथवर अतिक्रमण असल्याने नागरिक वर्दळीच्या रस्त्यांवरून चालतात. यामुळे मोरभवन परिसरात अपघात होतात. नागरिकांनी फूटपाथचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महापालिका आयुक्तांना पत्र देऊन फूटपाथवर कायमस्वरूपी बॅरिकेडस् लावण्यात येणार आहेत.फूटपाथ संघटनेचेअपर आयुक्तांना निवेदनसीताबर्डी परिसरातील फूटपाथच्या कडेला व्यवसाय करण्यासाठी महापालिकेच्या फेरीवाला समितीने नोंदणी असलेल्या हॉकर्सला परवानगी दिलेली आहे. महापालिकेने हॉकर्स झोन घोषित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून हॉकर्सवर कारवाई केली जात आहे. यासंदर्भात नागपूर फेरीवाला फू टपाथ दुकानदार संघटनेचे महामंत्री रज्जाक कुरेशी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांना निवेदन सादर करून चर्चा केली. कारवाईदरम्यान हॉकर्सचे होणारे नुकसान टाळावे. आकारण्यात येणारा दंड अन्यायकारक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. शिष्टमंडळात संदीप गुहे, इम्तीयाज शाहीद, जुगल थोरात, संजू गुप्ता, शब्बीर शेख, दिलीप शाहू, राकेश ठाकूर, अकबर मिनाज, अफरोज आलम आदींचा समावेश होता.