शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात सिराजचा पीसीआर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST

कोरोनाचे बनावट प्रमाणपत्र भोवले : फरार साथीदाराची चौकशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलिसांची कोठडी चुकविण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट ...

कोरोनाचे बनावट प्रमाणपत्र भोवले : फरार साथीदाराची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोलिसांची कोठडी चुकविण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर करणारा

कुख्यात बुकी सिराज रमजान शेख (वय ४८, रा. सोमवारी क्वार्टर) याला न्यायालयाने आज पुन्हा एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, सिराजच्या काही साथीदारांची पोलीस चौकशी करीत आहेत.

नागपुरातील कुख्यात बुकी असलेला सिराज लॉटरी, ट्रॅव्हल्स आणि केबलचा व्यवसाय दाखवून

आपल्या काळ्या धंद्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करतो. चार आठवड्यांपूर्वी त्याच्या साथीदारांना क्रिकेट बेटिंग करताना पोलिसांनी पकडले तेव्हा सिराज फरार होता. त्याचा गुन्हेगारी अहवाल समोर येताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सिराजला शोधून अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ६ मे च्या रात्री आपल्या पथकामार्फत कुख्यात सिराजला पकडले. ठाण्यात पोहचण्यापूर्वीच सिराजने साथीदारांच्या माध्यमातून कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या आधारे सिराजने पोलीस कोठडीतून सटकण्याचा डाव टाकला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी सिराजची टेस्ट करून घेतली. त्यात तो निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सिराजविरुद्ध कोरोना संसर्गाच्या धोक्याचा आणि बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्याला त्यात अटक करून सिराजला कोरोनाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून देणारे गजानन कोहाडकर तसेच जावेद यांनाही अटक केली. शनिवारी, रविवारी आणि सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाची प्रगती दिसत असल्यामुळे तीन दिवसांपासून

न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.

---

बबलूची शोधाशोध

कुख्यात सिराज शेखच्या बबलू नामक साथीदाराकडे मादक पदार्थ आणि अवैध धंद्याची माहिती असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीस बबलूचा शोध घेत आहेत. सिराज तसेच बबलूची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाच्या तपासावर नजर ठेवली आहे.

---