शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

सक्करदरा हत्याकांडातील आरोपींना पीसीआर

By admin | Updated: September 11, 2016 02:28 IST

सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची हत्या करणाऱ्या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून...

नागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची हत्या करणाऱ्या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, कोर्टातून त्यांचा १४ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला.हैदरखान नामक मित्रासोबत खंडणी वसुलीसाठी आलेल्या कुख्यात आशिष राऊतवर शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास सारंग नरेश पुट्टेवार (३५), त्याचा भाऊ ऋषी, शंकर गणपतराव शिरपूरकर (४२) या तिघांनी चाकूचे सपासप घाव घातले. नंतर त्याला दगडानेही ठेचले. कमला नेहरू महाविद्यालयाजवळच्या बुधवारी बाजारात दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडवून दिली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर राबणाऱ्या छोट्या दुकानदारांकडून कुख्यात आशिष खंडणी वसूल करायचा. त्यांना शिवीगाळ करून मारहाणही करायचा त्यामुळे त्याच्याबद्दल उपरोक्त आरोपींसह अनेकांच्या मनात तीव्र रोष होता. शुक्रवारी दुपारी याच कारणामुळे आशिषची हत्या झाली. त्यानंतर सक्करदरा पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा १४ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला.(प्रतिनिधी)नंदनवनमध्येही चौघांना अटक नंदनवन-खरबी मार्गावर सुदेश ऊर्फ मायकेल दिनेश राऊत (वय २४, रा. खरबी) या गुंडावरही इब्राहिम खान त्याचा भाचा सलीम अली, मोहसीन लल्ला, सोनू आणि सलमानने प्राणघातक हल्ला चढवला होता. आरोपींनी घातक शस्त्राने सुदेशच्या पार्श्वभागावर घाव घातले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो कोमात गेला असून, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी इब्राहिम, सलीम आणि मोहसीनला अटक केली. त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.