शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘पे अ‍ॅण्ड पार्क’ नि:शुल्क तरीही वसुली जोरात

By admin | Updated: July 7, 2016 02:51 IST

महापालिकेचे वाहतूक अभियंता यांनी मंगळवारपासून पंचशील चौक ते लोकमत चौक दरम्यान पार्किंग नि:शुल्क केल्याचे जाहीर केले.

पंचशील ते लोकमत चौक दरम्यानचा प्रकार : मनपाच्या नावाने पावतीही देतात मंगेश व्यवहारे नागपूरमहापालिकेचे वाहतूक अभियंता यांनी मंगळवारपासून पंचशील चौक ते लोकमत चौक दरम्यान पार्किंग नि:शुल्क केल्याचे जाहीर केले. असे असतानाही बुधवारी ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चे कंत्राट दिलेल्या एजन्सीचे कर्मचारी धडाक्याने वसुली करीत होते. पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनचालकाला महापालिकेची पे अ‍ॅण्ड पार्कची १० रुपयांची पावतीही देण्यात येत होती. लोकमतने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले आहे. महापालिकेने नागरिकांना पार्किंगचे पैसे देऊ नका असे आवाहन केले, परंतु अवैध वसुली करणाऱ्या एजन्सीला बरखास्त केले नाही. त्यामुळे एजन्सीचा अवैध वसुलीचा धंदा बुधवारी जोरात सुरू होता. या फसवेगिरीच्या विरोधात आता महापालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. पंचशील चौक ते लोकमत चौकादरम्यान महापालिकेने पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू केली होती. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’साठी उड्डाण पुलाखालच्या जागेवर वाहने पार्क करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या एजन्सी कडून पार्किंग शुल्क वसूल केले जात होते. दुचाकी वाहनाच्या पार्किंगसाठी एजन्सीचे कर्मचारी १० रुपये शुल्क वसूल करीत होते. परंतु पे अ‍ॅण्ड पार्कच्या बाबातीत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. दोन मिनिटांच्या कामासाठी १० रुपये देणे नागरिकांना परवडणारे नव्हते. बरेचदा एजन्सीचे कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीही व्हायची. महापालिकेकडे पे अ‍ॅण्ड पार्क संदर्भात तक्रारी वाढत असल्याने वाहतूक अभियंत्यांनी पंचशील चौक ते लोकमत चौकादरम्यान उड्डाणपुलाखाली पार्किंग नि:शुल्क केले. महापालिकेने घेतलेला निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर पार्किंगचे पैसे देऊ नका असे आवाहनही नागरिकांना केले. परंतु बुधवारी सकाळपासून एजन्सीचे कर्मचारी नेहमीप्रमाणे आपले दुकान लावून पुलाखाली बसले. पंचशील ते लोकमत चौकादरम्यान पार्क झालेल्या दुचाकी वाहनांकडून शुल्क आकारू लागले. दुपारी १ पर्यंत बऱ्याच वाहनांनी येथे पार्किंग केले होते. प्रति वाहन १० रुपये या हिशेबाने हे कर्मचारी वसूल करीत होते. पार्किंगची रितसर पावतीही देत होते. (प्रतिनिधी)तुम्हाला पैसे द्यावेच लागेललोकमत प्रतिनिधींनी सुद्धा आपले वाहन ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ मध्ये पार्क केले. तेथे असलेला एजन्सीचा कर्मचारी पावती घेऊन आला. त्याने गाडीचा नंबर लिहून रीतसर महापालिकेची पावतीही दिली. परंतु सदर प्रतिनिधीने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी गाडी काढण्यास सांगितले. प्रतिनिधीने त्यांना महापालिकेने पार्किंग नि:शुल्क केले असल्याचे सांगितले. वृत्तपत्रात तशा बातम्याही प्रकाशित झाल्याचे सांगितले. परंतु त्या कर्मचाऱ्याने आम्हाला याबाबत काही माहीत नाही, असी भूमिका घेत तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यावेच लागेल असे बजावले.नागरिकांनाही माहिती नाहीलोकमत प्रतिनिधीने वाहने पार्क करणाऱ्या काही नागरिकांशी संवाद साधला. आजपासून येथील पार्किंग नि:शुल्क झाले असल्याची माहिती आहे का, अशी विचारणा केली असता अनेकांनी नकार दिला. मनपाकडून जनजागृतीच नाहीमहापालिकेने पार्किंग नि:शुल्क करण्यापूर्वी या परिसरात जाहीर नोटीस लावणे गरजेचे होते. दुकान लावून बसलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना तेथून हाकलणे गरजेचे होते. नागरिकांची लूट होऊ नये म्हणून परिसरात विभागाचे कर्मचारी तैनात करणे गरजेचे होते. परंतु अशी कुठलीही जनजागृती महापालिकेकडून करण्यात आली नाही. त्यामुळे एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची पार्किंगच्या नावावर अवैध वसुली सुरू आहे.