शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

पावणेदोन कोटींचा गांजा जप्त

By admin | Updated: September 9, 2016 03:14 IST

मरगसूर (ता. काटोल) येथील एका गोदामात ठेवलेला गांजाचा साठा नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून मोठ्या शिताफीने जप्त केला.

नागपूर : मरगसूर (ता. काटोल) येथील एका गोदामात ठेवलेला गांजाचा साठा नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून मोठ्या शिताफीने जप्त केला. या कारवाईमध्ये १ कोटी ७४ लाख रुपये किमतीच्या गांजासाठ्यासह एकूण २ कोटी १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय, १२ जणांना अटक केली. या टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन असून, नागपूर ग्रामीण पोलीस याचा सखोल तपास करणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी पत्रपरिषदेत दिली. या कारवाईसंदर्भात पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी सांगितले की, या गांजाची तस्करी विशाखापट्टणम येथून केली जात आहे. काटोल तालुक्यातील मरगसूर गावालगत मनीषसिंहचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आणला जातो. हा गांजा कधी व कुठे पोहोचवायचा, याचे निर्देश दिल्लीहून दिले जातात. दरम्यान, सोमवारी सकाळी चिखली (मैना) शिवारात डीएल ४ सी/एबी ६७०० क्रमांकाच्या कारला अपघात झाला. या कारमध्ये १९ लाख रुपये किमतीचा १ क्विंटल ९० किलो गांजा आढळून आल्याने अमितसिंह तोमर व विजयपाल सूरजराम पोई (२७, आरके पुरम, दिल्ली) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी या गांजाची उचल मरगसूर येथील फार्म हाऊसमधून केल्याची माहिती मनीषसिंहने पोलीस चौकशीदरम्यान दिली होती.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मरगसूर येथील फार्म हाऊसवर धाड टाकली. तिथे एपी-३१/टीटी-९९०२ क्रमांकाचा टिप्पर आढळून आला. टिप्परची झडती घेतली असता, त्यात रेतीखाली १ क्विंटल ७४६ किलो १८० ग्रॅम गांजा आढळला. त्यामुळे या कारवाईत गांजा, टिप्पर तसेच एमएच-३१/सीएम-२०५१ क्रमांकाची कार आणि एमएच-३१/एवाय-३४२५ क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा जप्त करण्यात आली, असेही अनंत रोकडे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहीरकर, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद सराफ, काटोलचे ठाणेदार दिगंबर चव्हाण उल्हास भुसारी व अजाबसिंह जारवाल यांच्या पथकाने केली. (जिल्हा प्रतिनिधी) अटकेतील आरोपीगांजा प्रकरणात मनीषसिंह धु्रवकुमारसिंह (३८, रा. मरगसूर, ता. काटोल), रामशरण सिंह रामबालसिंह (४६, रा. मरगसूर, ता. काटोल), निखिलेश दिनेश बक्षी (३१, रा. धरमपेठ, नागपूर) व नागुला विनय संभा शिवडू (३२, रा. कीर्तीनगर, तेलंगणा), गोलू राजपूत शाहू (१९, कानपूर, उत्तर प्रदेश), आनंदकुमार मदनलाल ठकुराल (४५, रा. दिल्ली), जसंवतसिंग पूरणसिंग (४६, रा. टागोर गार्डन, नवी दिल्ली), अरविंदकुमार मुकूल ज्योतीनारायण प्रसाद (३०, रा. पानापूर, जिल्हा मुजफ्फरपूर, बिहार), मुकेशकुमार छित्रपाल (२६, रा. इंद्रपुरी, बुद्धनगर, दिल्ली), सुखवीरसिंग सुनोपचालन सिंग (४५, रा. श्यामनगर, विष्णू गार्डन, नवी दिल्ली), अमीतकुमार हुकूमचंद (२४, रा. सुल्तानपुरी, दिल्ली) व विष्णूदास राजेंद्रदास (३६, रा. इंद्रपुरी, जेजे कॉलनी, नवी दिल्ली) अशा एकूण १२ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.