शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निवास कोविड केअर सेंटरमधील रुग्ण अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 22:32 IST

आमदार निवासातील कोविड सेंटर सुरू होऊन एक दिवसाचा कालावधी होत नाही तोच दुसऱ्या दिवशी विविध समस्यांना येथील रुग्णांना तोंड देण्याची वेळ आली. मंगळवारी सकाळपासून पिण्याचे पाणी नव्हते, एम्सच्या रुग्णांना दुपारचे जेवण मिळाले नाही. सायंकाळी पाणी एका टँकमध्ये आल्याने रुग्णांना आपले कक्ष सोडून खाली यावे लागल्याची रुग्णाची तक्रार आहे.

ठळक मुद्देपाणी नाही, दुपारचे जेवण नाही : पॉझिटिव्ह रुग्णांचा संताप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमदार निवासातील कोविड सेंटर सुरू होऊन एक दिवसाचा कालावधी होत नाही तोच दुसऱ्या दिवशी विविध समस्यांना येथील रुग्णांना तोंड देण्याची वेळ आली. मंगळवारी सकाळपासून पिण्याचे पाणी नव्हते, एम्सच्या रुग्णांना दुपारचे जेवण मिळाले नाही. सायंकाळी पाणी एका टँकमध्ये आल्याने रुग्णांना आपले कक्ष सोडून खाली यावे लागल्याची रुग्णाची तक्रार आहे.सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचे ‘आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंद करून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. रविवारी रात्रीपासून हे सेंटर रुग्णसेवेत सुरू झाले. सध्या या सेंटरमध्ये ८५ रुग्ण उपचाराला आहेत. येथील एका रुग्णाने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले की, आज सकाळपासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. येथील डॉक्टरांनी फोन करून माहिती दिल्यानंतर सायंकाळी एका वाहनातून टाकीभरून पाणी आले. हे पाणी खोलीपर्यंत पोहचविण्यात न आल्याने रुग्णांना चौथ्या माळ्यावरून खाली येत पाणी घेऊन वर चढावे लागले. अनेकांकडे पाणी साठवण्याची सोय नव्हती, ते अडचणीत आले. दुपारच्या सुमारास एम्समधून १९ रुग्ण दाखल झाले. या रुग्णांना जेवण मिळाले नाही. याचीही तक्रार येथील संबंधित डॉक्टरांकडे करण्यात आल्याचेही ते म्हणाले.या संदर्भात तहसीलदार राहुल सारंग यांना विचारले असता, ते म्हणाले, अचानक रुग्ण वाढल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली. परंतु ती तातडीने सोडविण्यातही आली. ज्यांच्याकडे पाणी घेऊन जाण्यची सोय नव्हती त्यांना जार उपलब्ध करून देण्यात आले. दुपारी जेवण झाल्यानंतर एम्समधून रुग्ण आले. यामुळे जेवणाची सोय होऊ शकली नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLA Hostelआमदार निवास