शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला

By admin | Updated: April 5, 2015 02:25 IST

निवासी डॉक्टर हे प्रत्येक हॉस्पिटलचा कणा असतात. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयांत (सुपर स्पेशालिटी रुग्णालय) हे पदच मंजूर नाहीत.

सुमेध वाघमारे नागपूरनिवासी डॉक्टर हे प्रत्येक हॉस्पिटलचा कणा असतात. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयांत (सुपर स्पेशालिटी रुग्णालय) हे पदच मंजूर नाहीत. परिणामी, हॉस्पिटलमधील सेवांचा बोजवारा उडाला आहे. सध्याच्या स्थितीत कनिष्ठ व वरिष्ठ असे मिळून ८६ निवासी डॉक्टरांची गरज आहे. हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर निघून गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेणारे निवासी डॉक्टरच नसल्याने गेल्या १७ वर्षांपासून हॉस्पिटलचे कामकाज प्रभावित झाले आहेत. रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ १९९८ साली तयार झाले. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, हृदयरोग, यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी व न्यूरोसर्जरी अशा पाच विभागातून रुग्णसेवा सुरू झाली खरी, परंतु सकाळ, दुपारी आणि सायंकाळ या तीन पाळीत रुग्णांना सांभाळणारे डॉक्टरच राहत नाही. यामुळे रुग्णांची जबाबदारी परिचारिकांवर येत आहे. अशा बिकट अवस्थेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुपर रुग्णसेवा सापडली आहे. धक्कादायक म्हणजे, आठवड्यापूर्वी साप चावलेल्या एक ३५ वर्षीय महिलेला सुपरमध्ये हिमोडायलिसीस करायचे होते. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरच नसल्याने त्या महिलेवर वेळेवर हिमोडायलिसीस होऊच शकले नाही. परिणामी त्या महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वी अशा घटना झाल्याचे सांगण्यात येते.२०१२ पासून मंजुरीच नाहीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१२ मध्ये डी.एम.कार्डिओलॉजी व डी.एम.गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी हे अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले. तसेच विविध विषयांमध्ये डी.एम. व एम.सीएच हे अभ्यासक्रम सुरू करावयाचे असल्याने कनिष्ठ निवासी डॉक्टरांची ३९ तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ४७ असे एकूण ८६ पदांचा प्रस्ताव २०१२ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला पाठविण्यात आला. परंतु या विभागाच्या उदासीनतेमुळे अद्यापही या पदांना मंजुरी मिळालेली नाही.