शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा रुग्णालयात रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर : रुग्णांचा जीव धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 23:12 IST

Municipal Hospital Patient safety on air, nagpur news महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली असता इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली आणि आयसोलेशन रुग्णालयामध्ये फायर सुरक्षात्मक यंत्रणा नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देइंदिरा गांधी रुग्णालयात यंत्रणेचा अभाव : फायर ऑडिटनंतरही उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर आता नागपूरसह राज्यातील रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली असता इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली आणि आयसोलेशन रुग्णालयामध्ये फायर सुरक्षात्मक यंत्रणा नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयाची इमारत तीन मजली आहे. १५० बेड क्षमतेच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. परंतु या रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने फायर इक्विपमेंट बसविण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ऑडिट केल्यानंतरही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पाण्याची टाकी, हायड्रन्ट, पम्प हाऊस, स्प्रिंकलर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर अशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचे निदशंनास आले.

अशीच अवस्था पाचपावली सूतिकागृहाची आहे. येथे उत्तर व पूर्व नागपुरातील महिला प्रसूतीसाठी येतात. सूतिकागृहाची इमारत बहुमजली नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अशीच अवस्था आयसोलेशन रुग्णालयाची आहे. या रुग्णालयाची इमारत जुनी असून येथे आग नियंत्रणाची सक्षम यंत्रणा नाही. दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनपा इमारतींतही उपाययोजना नाही

नागपूर महापालिकेच्या वतीने व्यापारी इमारती, अन्य इमारती तसेच मोठे मॉल, सिनेमागृहे आदींना फायर ऑडिट करण्याचे तसेच येथे फायर उपकरणे बसविण्यासंदर्भात सांगण्यात येते़ ही उपकरणे नसल्यास अशा इमारतधारकांवर कारवाई करण्यात येते. परंतु, महापालिकेच्या रुग्णालयांसह शासकीय इमारतीमध्येही कुठल्याही प्रकारची अग्निशामक उपकरणे लावण्यात आलेली नसल्याचे दिसून येते़

आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा

रुग्णालयाच्या बांधकामानुसार पाण्याची व्यवस्था(टाकी)

 वीज नसल्यास पाणीपुरवठ्यासाठी पंप

वेळप्रसंगी बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग

अग्निशामक उपकरण

हायड्रन्ट व्यवस्था

स्मोक डिटेक्टर

फायर अलार्म

पम्प हाऊस

स्प्रिंकलर

५६१ पैकी २०० रुग्णालयांनी केली पूर्तता

नागपूर शहरातील ५६१ रुग्णालयांपैकी २०० रुग्णालयांनी आग नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. परिपूर्तता प्रमाणपत्र न घेतलेल्या उर्वरित रुग्णालयांंचे वेळोवेळी ऑडिट करून पूर्तता करण्यासंदर्भात नोटीस बजावल्या जातात. परंतु काही रुग्णालये जुन्या इमारतीत आहेत. अशा इमारतीत आवश्यक असलेली यंत्रणा उभारणे शक्य नाही. त्यामुळे शंभर टक्के पूर्तता होणे शक्य नाही.

राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल