नागपूर : एका रुग्णाला आठ वर्षांपूर्वी कर्करोगामुळे लिंग गमवावे लागले होते. राजस्थानमधील या रुग्णाचे पूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून ९.३० तास दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. अशा प्रकारची मध्य भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या शस्त्रक्रियेने रुग्णाला नवे आयुष्य मिळाले.
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल येथे प्लॅस्टिक सर्जरी विभागाद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
लिंगाची रचना तयार करण्यासाठी रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली आणि नंतर जघन भागात लावण्यात आले. ही संपूर्ण शस्त्रक्रिया एका टप्प्यात करण्यात आली.
सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे गुंतागुंतीची प्रक्रिया : डॉ. अभिराम मुंडले यांनी सांगितले, दोन मिलिमीटरच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या म्हणजे लहान धमन्या आणि शिरा ज्यांचा अंतर्गत व्यास १ ते ६ मिमीपर्यंत असतो, त्या जोडणे हे या शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीची प्रक्रिया होती.
अनेक रुग्णांसाठी सुविधा फायदेशीर ठरू शकते
अशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात. अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात, अशी माहिती डॉ. सजल मित्रा यांनी दिली.