शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा

By admin | Updated: July 17, 2015 03:25 IST

कौतुकायन-२०१५ या आयसीडीच्या समारंभात वैद्यकीय आणि अभियंत्रिकी स्पर्धा परीक्षा, ..

नागपूर : कौतुकायन-२०१५ या आयसीडीच्या समारंभात वैद्यकीय आणि अभियंत्रिकी स्पर्धा परीक्षा, बारावी व दहावी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. परगावचे विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने संत एकनाथ रंगमंदिर येथे उपस्थित होते. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कुळकर्णी आणि सोलापूरचे सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजीव प्रधान उपस्थित होते. रुग्णसेवेचे व्रत हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मत डॉ. सतीश कुळकर्णी यांनी व्यक्त केले. तर डॉ. राजीव प्रधान यांनी मुलांना सतत शिकत राहण्याचे आवाहन केले. मुलांनी स्वत:च्या क्षमतेबद्दल न्यूनगंड ठेवू नये, असे ते म्हणाले. आयसीडीच्या देदीप्यमान वाटचालीचा सचित्र आढावा डॉ. आशिष मिरजगांवकर यांनी मांडला. विद्यार्थ्यांचे डीएमआयटी पद्धतीने करिअर सिलेक्शन, करिअर गाईडन्स व आवडीनिवडी समजावून घेण्याचे काम आयसीडी करिअर कौन्सिलिंगमध्ये कसे केले जाते, हे डॉ. केतकी हातवळणे यांनी सांगितले. आजवर परदेशात किती विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमासाठी पाठविले, याचा सचित्र अहवाल हातवळणे यांनी मांडला. यावर्षी आयसीडीने मिळविलेल्या उत्तुंग यशाचे रहस्य प्रा. डॉ. सुधीर शिरोडकर यांनी उलगडले आणि २०१४-१५ या वर्षांतील विविध उपक्रमांची माहिती दिली.यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांपैकी शुभम बांगड, अपूर्वा रंजलकर, संपदा नागरे, गिरीजा दिवेकर, पार्थ धांडे, अपूर्वा गोरे, श्वेता चोपडे आणि प्रतीक्षा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. माधुरी देशमुख व प्रा. चारुशिला क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. प्रफुल्ल मिरजगांवकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. विवेक गोसावी व प्रा. विजय देशमुख यांनी केले. आयसीडीचे कार्यकारी संचालक डॉ. आशिष मिरजगांवकर यांनी आभार मानले. (वा.प्र.)