शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कंट्रोलरच्या माध्यमातून पथदिव्यांचे नियंत्रण

By admin | Updated: October 1, 2015 03:24 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने नागपूर शहराची वाटचाल सुरू असतानाच ऊर्जा बचतीसाठी महापालिका शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याचा अभिनव उपक्रम राबवित आहे.

विद्युत विभागाचा उपक्रम : १ लाख २७ हजार एलईडी दिवे बसविणारनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने नागपूर शहराची वाटचाल सुरू असतानाच ऊर्जा बचतीसाठी महापालिका शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याचा अभिनव उपक्रम राबवित आहे. शहरात १ लाख २७ हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. या दिव्यांचे ‘कंट्रोलर विथ फिडबॅक’ या अत्याधुनिक उपकरणाच्या माध्यमातून नियंत्रण करण्यात येणार जाणार आहे.ऊर्जा बचत व्हावी यासाठी विद्युत विभागाने शहरात २७ हजार एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी ७०० दिवे लावण्यात आले आहेत. या दिव्यांचे नवीन यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण केले जात आहे. यात पथदिव्यांचे सर्किट असलेल्या ठिकाणी चीप बसवून त्यात डाटा संग्रहित होणार आहे. त्यामुळे एखाद्या मार्गावरील दिवा बंद पडल्यास त्याची माहिती कंट्रोलरच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सोपे होणार आहे. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत पहिल्या टप्प्यात शहरात दीड वर्षात २७ हजार खांबांवर एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील ७०० एलईडी दिवे लावण्यात आले असून काम प्रगतिपथावर आहे. लवकरच एक लाख एलईडी लावण्याची निविदा विभागामार्फत काढली जाणार आहे. २५० वॅट सोडियम वेपर दिव्यांच्या जागी १५० वॅट क्षमतेचे एलईडी लावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होत आहे. सोबतच या दिव्यामुळे अधिक प्रकाश मिळत आहे. मनपाने जे. के. सोल्युशनशी शहरात एलईडी दिवे लावण्याचा १८ मे २०१४ रोजी करार करून कंत्राट दिले आहे. कंत्राटदाराला १८ महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. (प्रतिनिधी)