शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नागपुरात बायोवेस्टमुळे इमारत बनली मिनी डम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 07:00 IST

नागपुरात रामदासपेठेतील ध्रुव पॅथोलॉजी लॅब असलेली संपूर्ण इमारत जैविक कचऱ्यामुळे (बायोवेस्ट) मिनि डम्पिंग यार्डमध्ये रुपांतरित झाली आहे.

ठळक मुद्दे रुग्ण, नातेवाईकांना संसर्गाचा वाढला धोकारामदासपेठेतील धृव पॅथोलॉजी लॅबमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जसजसे शासनाकडून कोरोनो संदर्भात उपचार व चाचणीची परवानगी खाजगी रुग्णालये आणि पॅथोलॉजी लॅब्सला देण्यात येत आहेत, तसतसे रुग्णांसोबचे व्यवहार, व्यवस्थापनाबाबत त्यांच्याकडून उद्दामपणा व्यक्त होत असल्याचे उघडकीस येत आहे. रामदासपेठेतील ध्रुव पॅथोलॉजी लॅब असलेली संपूर्ण इमारत जैविक कचऱ्यामुळे (बायोवेस्ट) मिनि डम्पिंग यार्डमध्ये रुपांतरित झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका जसजसा वाढतो आहे तसतसे खाजगी रुग्णालये, डॉक्टर्स आणि पॅथोलॉजी लॅब्सला शासकीय रुग्णालयांसोबतच चाचणी आणि उपचारासाठीची परवानगी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासकीय रुग्णालये व पॅथेलॉजी लॅब्समध्ये होत असलेली गर्दी बघून सर्वसामान्य नागरिक तपासणी व उपचारासाठी खाजगीकडे वळत आहेत. ही खाजगी रुग्णालये व लॅब्स नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ज्यादा शुल्क वसूल करत तर आहेतच. शिवाय, याच नागरिकांचा जीवही धोक्यात टाकत असल्याचा खळबळजनक प्रकारही पुढे येत आहे. उदारणादाखल रामदासपेठेतील ध्रुव पॅथेलॉजी लॅबद्वारे त्या संपूर्ण इमारतीला वेठीस धरण्यात येत असल्याचे चित्र आहे.

या लॅबमध्ये कोरोना संदर्भातील तपासणीसाठी प्रचंड गर्दी उसळलेली असते. टेस्ट झाल्यानंतर निघणारा जैविक कचरा अर्थात बायोवेस्ट लॅबपुढील गॅलरीतच टाकण्यात येतो. हा कचऱ्याचा ढिग वाढल्यामुळे शुक्रवारी तो संपूर्ण कचरा तळमजल्यावर टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा सगळा कचरा सर्वसामान्यांच्या वापरासाठी असलेल्या लिफ्टमधूनच आणला जातो. यात मुख्य बाब अशी की जेव्हा कचरा आणला जात होता, त्याचवेळी अनेक रुग्ण व तपासणीसाठी येणारे नागरिक त्याच लिफ्टचा वापर करत होते. अशा वेळी लॅबच्या कर्मचाऱ्यांकडून निर्जुंतुकीकरणाची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

लॅबच्या खालच्या मजल्यावरच अवधूत नेत्रालय असल्याने या इमारतीत कोरोना तपासणी व इतर तपासणीच्या कामासोबतच नेत्रतपासणीसाठी येणाºया रुग्णांची संख्याही मोठी आहे. हे रुग्ण आपल्या वेळेसाठी दिवसभर रांगेत उभे असतात. त्यांच्या नजिकच हा बायोवेस्टचा ढिग पडलेला असतो. हा सगळा कचरा प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये बंद केला जातो. मात्र, हे पॉलिथिनही अधामधातून फाटलेले असतात. अशा स्थितीत वाºयाच्या वेगासोबतच संक्रमणाचा वेगही वाढण्याची शक्यता असते. या सगळ्याबाबत लॅबकडून दुर्लक्ष केले जात आहे आणि येणाºया रुग्णांचे जीव धोक्यात घातले जात आहे.घरी जाऊन टेस्टिंगची सुविधालॅबकडून नागरिकांच्या इच्छेनुसार घरीजाऊन कोरोना तपासणीची सुविधा दिली जात आहे. परत येताना बायोवेस्टही सोबतच असते. अशा स्थितीत लॅबमध्ये येणाºयांसाठी कोरोना घेऊन आणल्याचा हा प्रकार आहे.बायोवेस्ट डिमोलायझेशनची व्यवस्थाच नाहीखरे तर हा सगळा बायोवेस्ट नष्ट करण्यासाठी किंवा त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची विशिष्ट पद्धत आहे. मात्र, त्यासंदर्भात निष्काळजीपणा दिसून येत आहे. महापालिकेकडून या संदर्भात कठोर धोरण अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPathology Labपॅथॉलॉजी लॅब