शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संचालकाचे अन्य साथीदार पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:38 IST

उमरेड : लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचे जाळे विणत केवळ १८ महिन्यात दामदुप्पट रक्कम परत करून देण्याचा गोरखधंदा उजेडात आल्यानंतर उमरेड ...

उमरेड : लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचे जाळे विणत केवळ १८ महिन्यात दामदुप्पट रक्कम परत करून देण्याचा गोरखधंदा उजेडात आल्यानंतर उमरेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात एकमेकांना सोबत घेत अनेकांचे घर गाठणारे अन्य काही साथीदार सुद्धा पसार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. एजीएम कॉर्पेोरेशन डिजिटल अ‍ॅडव्हर्टाईजमेंट या कंपनीने केलेल्या ३० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अजय कृष्णराव लधवे (४७, इतवारी पेठ, उमरेड) याला शनिवारी (दि.३०) गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने जेरबंद केले. या कंपनीचे सुशील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे आणि भरत शाहू हे अन्य तीन मुख्य संचालक भूमीगत झालेत. लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्यांमध्ये केवळ ही चौकडी नसून त्यांना साथ देणारे अन्य काही साथीदार सुद्धा असल्याचे तपासात पुढे येत आहे. सुमारे दोन वर्षांपासून असंख्य तरुणांची साखळीच या गोरखधंद्यात सहभागी होती. उमरेड परिसरातील मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांकडून सुद्धा लाखो रुपयांची माया या कंपनीच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आहे. ज्या लोकांनी या कंपनीत ही रक्कम गुंतविली त्यांनी पुढाकार घेतल्यास या प्रकरणाची पाळेमुळे उघडकीस येणार आहे. शहरातील काही संस्थांमध्ये आरोपी अजय लधवे कार्यरत आहे.

प्लॉटचेही आमिष

लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या लोकांना १८ महिन्यात दुप्पट रक्कम, स्क्रीनवर डिजिटल जाहिरात सोबतच अधिकची गुंतवणूक करणाऱ्यांना प्लॉटचेही आमिष दाखविले जात होते. उमरेड येथीलच चारचौघांची ही टोळी अधिकांश लोकांकडे पोहोचली. या ‘डबल धमाका’ ऑफरच्या जाळ्यात काही फसले तर काहींनी हुशारी दाखवित जैसे थे परिस्थितीत जगणे पसंत केल्याने बहुसंख्य या फसवेगिरीच्या गोरखधंद्यात वाचले.