शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

इथेनॉल बसला मिळताहेत प्रवासी

By admin | Updated: January 15, 2015 01:00 IST

ग्रीन सिटी, क्लीन सिटी संकल्पनेच्या आधारावर देशात पहिल्यांदा नागपूर शहरात इथेनॉल बस सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात नागपूरकरांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला आहे.

एक लिटरमध्ये धावते १.७० किमी राजीव सिंह -नागपूर ग्रीन सिटी, क्लीन सिटी संकल्पनेच्या आधारावर देशात पहिल्यांदा नागपूर शहरात इथेनॉल बस सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात नागपूरकरांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला आहे. ही बस इथेनॉलवर धावत असल्यामुळे या बसवर अधिक खर्च होत असला तरी, नागरिकांचे आरोग्य व पर्यावरणाचा विचार करता ही बस फायद्याचीच आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्रीन बस रिझर्व्ह बँक चौक ते खापरी चौकादरम्यान धावते. एक लिटर इथेनॉलमध्ये १.६५ ते १.७० किलोमीटरचा पल्ला गाठला जात आहे. दररोज ११५ ते १२० लिटर इथेनॉलचा वापर केला जात आहे. ही बस दररोज सुमारे १९६ किलोमीटर धावत आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या बसमध्ये पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये भाडे आकारले जाते. तिकिटांपासून दररोज ३६५० रुपये ते ३८०० रुपये मिळत आहेत. १४ फेऱ्यांमध्ये २९५ ते ३०० प्रवासी प्रवास करतात. स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने ही बस तयार केली आहे. बस इको फ्रेंडली आहे. यामुळेच केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम नागपुरात ही बस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. नागपुरात हा प्रयोग यशस्वी ठरला तर संपूर्ण देशात केंद्रीय योजना राबवून ही बस चालविण्याचा विचार सुरू आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने पाठविलेल्या दरसूचीला आरटीओने मंजुरी दिली व त्यानंतर बस सुरू करण्यात आली. सुरुवातीचे दोन आठवडे कुठलेही भाडे आकारण्यात आले नाही. मुंबईत बेस्टच्या बसमध्ये किमान तिकीट २० रुपये आहे. नागपुरात मात्र ग्रीन बसचे किमान भाडे १० रुपये आहे. नागपूरची शहर बससेवा वातानुकूलीत नाही. त्यामुळे ही इथेनॉल बस हाच एकमेव पर्याय आहे. (प्रतिनिधी)मार्चमध्ये येणार नवी बस शहरातील इतर मार्गांवर इथेनॉल बस चालविण्याच्या उद्देशाने स्कॅनिया कंपनीने आणखी चार बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस जानेवारीच्या सुरुवातीलाच येणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणांमुळे पोहोचू शकल्या नाही. आता मार्चमध्ये या बसेस मिळण्याची शक्यता आहे.