शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या भोजनाचेही होतेय खासगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:12 IST

टप्प्याटप्प्याने रेल्वेच्या सर्व विभागात आऊटसोर्सिंग सुरू असताना, ...

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचा आदेश धडकला : बेस किचनचा ताबा जाणार ‘आयआरसीटीसी’कडे

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टप्प्याटप्प्याने रेल्वेच्या सर्व विभागात आऊटसोर्सिंग सुरू असताना, आता रेल्वे बोर्डाने प्रवाशांना दर्जेदार भोजन पुरवीत असलेल्या बेस किचनचा ताबाही ‘आयआरसीटीसी’कडे (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन) देण्याचा घाट घातला आहे. त्याबाबतचा आदेश नुकताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात धडकला आहे. रेल्वेगाड्यात खासगी कंत्राटदारांकडून भोजन पुरवठा करताना प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी असताना, रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर आणि बल्लारशा येथे असे दोन बेस किचन आहेत तर मध्य रेल्वेत जवळपास १२ बेस किचन आहेत. बेस किचनमध्ये रेल्वेचे कर्मचारी भोजन, नाश्ता तयार करून ते रेल्वेगाड्यात पुरविण्याचे काम करतात. बेस किचनमध्ये रेल्वे बोर्डाने यापूर्वीच स्वयंपाक बनविण्याचे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिले आहे.बेस किचनमधील कारभार सुरळीत सुरू असताना, अचानक रेल्वे बोर्डाने बेस किचन ‘आयआरसीटीसी’ला सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. २५ वर्षांच्या लीजवर रेल्वे बोर्डाकडून हे बेस किचन ‘आयआरसीटीसी’ला देण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश मध्य रेल्वेच्या अखत्यारितील सर्व विभागांना पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे काही दिवसात किचनवर आयआरसीटीसीचा ताबा दिसणार आहे.प्रवाशांच्या वाढणार तक्रारी‘आयआरसीटीसी’कडे बेस किचनचा ताबा दिल्यानंतर आयआरसीटीसी रेल्वेगाड्यात भोजन पुरविण्याचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना देणार आहे. अनेकदा खासगी कंत्राटदारांकडून पेन्ट्रीकारमध्ये पुरविल्या जाणाºया भोजनाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे प्रवासी गोंधळ घालून रेल्वेगाडीत चेन पुलिंग करतात, असा अनुभव आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच अशा घटना होत असतात. कंत्राटदाराने पेन्ट्रीकारमध्ये ठेवलेले कामगार खासगी राहणार असल्यामुळे आणि रेल्वेशी त्यांचा संबंध नसल्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या भोजनाबाबतच्या तक्रारी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.बेस किचन सोपविण्यास आम्ही तयार‘रेल्वे बोर्डाकडून बेस किचन आयआरसीटीसी’ला सोपविण्याचा आदेश आला आहे. आयआरसीटीसीच्या अधिकाºयांनीही तीनवेळा भेट दिली, परंतु कधी ताबा द्यायचा याचा कालावधी ठरला नाही. ‘आयआरसीटीसी’ने मागितले तेव्हा बेस किचन देण्यास आम्ही तयार आहोत.’-कुश किशोर मिश्रा, सिनिअर डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर विभागपेंट्रीकारमधून प्रवाशांना मिळावी पावती‘आजपर्यंत पेंट्रीकारमधून प्रवाशांना खरेदी केलेल्या भोजनाची पावती मिळत नव्हती. त्यामुळे भोजन निकृष्ट असल्यास प्रवाशांना ग्राहक मंचात जाण्यासाठी कुठलाही पुरावा उपलब्ध राहत नव्हता. आता रेल्वेने आयआरसीटीसीकडे बेस किचनचा ताबा दिल्यानंतर प्रवाशांना भोजनासाठी आकारलेल्या दराबाबतची पावती मिळणे गरजेचे आहे. याशिवाय प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळावे.’-बसंतकुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र