शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भोजन महागात विकल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:32 IST

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाडी थांबविली. यामुळे या गाडीतील इतर प्रवाशांनाही त्रास होऊन ते आपसात भांडत होते. या तणावाच्या परिस्थितीत अखेर उपस्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर एका तासाने ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

ठळक मुद्देगीतांजली एक्स्प्रेसमधील घटना : ११ वेळा केली चेनपुलिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाडी थांबविली. यामुळे या गाडीतील इतर प्रवाशांनाही त्रास होऊन ते आपसात भांडत होते. या तणावाच्या परिस्थितीत अखेर उपस्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर एका तासाने ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसच्या पेंट्रीकारमधून भोजन तिप्पट दराने विकण्यात आल्यामुळे एसी कोचमधील एक महिला प्रवासी गायत्री नायर यांनी यास विरोध दर्शविला. परंतु व्हेंडर आपल्या जागी अडून बसला. नायर यांनी व्हेंडरला रेल्वे बोर्डाने ठरवून दिलेल्या खाद्यपदार्थांचा चार्ट दाखविल्यानंतरही तो आपल्या किमतीवर अडून होता. प्रकरण वाढत असल्याचे पाहून व्हेंडरने योग्य दराने भोजन देण्याचे मान्य केले. यामुळे नायर यांनी व्हेंडरला खडेबोल सुनावले. या कोचमधील दुसरी महिला प्रीती दास यांनीही पेंट्रीकार मॅनेजरला सुनावले. ही गाडी रात्री ९.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. यावेळी अनेक प्रवाशांनी ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी रेटून धरली. ए १ आणि बी १ कोचच्या प्रवाशांनी पेंट्रीकार मॅनेजरने अधिक दराने भोजन दिल्याबाबत माहिती नसल्याचे सांगितल्यावर प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवान आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परंतु प्रवासी आपल्या मागणीवर अडून होते. प्रवाशांनी ११ वेळा चेनपुलिंग करून गाडी रोखून धरली. अखेर प्रवाशांची समजूत घातल्यानंतर ही गाडी रात्री १०.१३ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी