शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पास बंद केल्यामुळे मोडले प्रवाशांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST

नागपूर : रेल्वेगाड्यांची संख्या वाढली असली तरी अद्याप मासिक पास सेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे पूर्वी ५०० रुपयांत ...

नागपूर : रेल्वेगाड्यांची संख्या वाढली असली तरी अद्याप मासिक पास सेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे पूर्वी ५०० रुपयांत महिनाभर होणाऱ्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल सात हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे रेल्वेने मासिक पास सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

-०२१९० नागपूर-मुंबई दुरांतो स्पेशल

-०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ स्पेशल

-०२०३६ नागपूर-पुणे विशेष स्पेशल

-०२१७० नागपूर-मुंबई सेवाग्राम स्पेशल

-०२२२४ अजनी-पुणे स्पेशल

-०२१५९ नागपूर-जबलपूर स्पेशल

-०११३७ नागपूर-अहमदाबाद स्पेशल

०१४०३ नागपूर-कोल्हापूर स्पेशल

-०२०४२ नागपूर-पुणे स्पेशल

-०२०२५ नागपूर-अमृतसर स्पेशल

-०२११४ नागपूर-पुणे गरीबरथ स्पेशल

-०९२१४ नागपूर-इंदूर स्पेशल

मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?

- मुंबईत कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झाल्यानंतर प्रवाशांना मासिक पास देण्यात येत आहे; त्यामुळे नागपूर विभागातही रेल्वे प्रशासनाने मासिक पास सुरु करण्याची मागणी होत आहे. मासिक पास बंद असल्यामुळे प्रवाशांना सात हजारांवर खर्च येत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. मुंबईप्रमाणे नागपुरातही मासिक पास देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

भुर्दंड किती दिवस सहन करायचा?

अधिक पैसे खर्च होत आहेत

‘मी नागपूर ते वर्धा रोज प्रवास करतो. पूर्वी केवळ ५५० रुपयांत रेल्वेचे मासिक पास मिळत होते; परंतु आता महिन्याकाठी सात हजार खर्च येत आहे. त्यामुळे रेल्वेने मासिक पास सुरू करण्याची गरज आहे.’

- हरिदास मोरस्कर, प्रवासी

गोंदियाला जाणे झाले महाग

‘कामानिमित्त रोज नागपूर ते गोंदिया प्रवास करावा लागतो; परंतु रेल्वेने मासिक पास देणे बंद केल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. पूर्वी केवळ ६६० रुपयांत मासिक पास मिळत होते; परंतु आता तब्बल ४५०० रुपये मोजावे लागत आहेत.’

- अशोक शर्मा, प्रवासी

रोज ३०० रुपयांचे पेट्रोल लागते

‘कामानिमित्त रोज सिंधी रेल्वे येथे ये-जा करावी लागते. मासिक पास सुरू असताना केवळ २७५ रुपये महिन्याला लागत होते; परंतु आता ३०० रुपयांचे पेट्रोल लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबईप्रमाणे नागपूर विभागातही मासिक पास सुरू करण्याची गरज आहे.’

- रहमान सिद्धीक बेरा, प्रवासी

मासिक पास सुरू करणे रेल्वे बोर्डाचा निर्णय

‘मासिक पास सुरू करणे हा रेल्वे बोर्डाचा निर्णय आहे. रेल्वे बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मासिक पास देणे सुरू करू.’

- एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

...........