शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोपटांची विक्री पकडली

By admin | Updated: April 17, 2017 02:01 IST

वन विभागाच्या पथकाने पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने रविवारी सकाळी शहरातील लकडगंज येथील

लकडगंज बाजारात धाड : तिघांना अटक नागपूर : वन विभागाच्या पथकाने पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने रविवारी सकाळी शहरातील लकडगंज येथील आठवडी बाजारात धाड घालून येथे पोपटांची विक्री करीत असलेल्या तीन आरोपींना अटक केली. शेख आबिद (वय २५) रा. मोमीनपुरा, अंजर अली (वय ३० वर्षे) रा. मोमीनपुरा व आलिम शाह (वय ३७ वर्षे) रा. मोमीनपुरा, अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईदरम्यान वन विभागाने आरोपींकडून एकूण १७ पोपट जप्त केले. यात नऊ मोठ्या पोपटांसह आठ लहान पिलांचा समावेश होता. त्यापैकी तीन लहान पिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य काही पिले जखमी झाले होते. वन विभाग आणि पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेच्या सदस्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या पथकाने आरोपी आणि त्यांच्याकडील पोपटांना ताब्यात घेऊन त्यांना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील विश्रामगृह येथे आणले. यानंतर येथे घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला. पोपट हा वन्यजीव कायद्याच्या शेड्यूलमध्ये मोडतो. त्यामुळे पोपटांची अशाप्रकारे बाजारात विक्री करणे किंवा त्याला घरातील पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवणे गुन्हा ठरतो. नागपूर वन विभागाने तीन वर्षांपूर्वी पोपटांच्या विक्रीविरुद्ध मोहीम उघडून अनेकांना अटक केली होती; शिवाय नागरिकांना आपल्या घरच्या पिंजऱ्यातील पोपटांना जंगलात सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी पोपटांना वन विभागाच्या स्वाधीन केले होते; शिवाय त्यानंतर वन विभागाने ते सर्व पोपट सेमिनरी हिल्स येथील जंगलात सोडले होते. मात्र त्यानंतर वन विभागाची ही मोहीम थंड पडली होती. गत दोन वर्षांत वन विभागातील शिकार प्रतिबंधक पथक आणि भरारी पथकाने एकही कारवाई केलेली नाही. कदाचित त्यामुळेच पोपटांची विक्री करणारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. ही कारवाई नागपूरचे उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक एल.जी. गेडाम, वनपाल यू.पी. बावणे, वनरक्षक पी.एम. पझारे, वनरक्षक पी.बी. होरे, डी.पी. कोहळे, के.डी. श्रीरंग व शुभम खोरगडे यांच्यासह पीपल फॉर अ‍ॅनिमल्स संस्थेचे सदस्य अखिल रोकडे, आशिष गोस्वामी, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे, आशिष कोरडे, आकाश मथागरे, ओंकार राऊत आणि मंगेश एनोरकर यांनी केली. (प्रतिनिधी)