शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

पार्किंग प्लाझा आहे पण, कार उभी ठेवता येत नाही

By admin | Updated: September 18, 2016 02:39 IST

नागपूर सुधार प्रन्यासने कित्येक वर्षानंतर शहरात एकमेव कार पार्किंग प्लाझा सीताबर्डी येथे तयार केला आहे.

सीताबर्डीतील वास्तव : ठेकेदारांची मनमानी, अधिकाऱ्यांचे संरक्षणनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने कित्येक वर्षानंतर शहरात एकमेव कार पार्किंग प्लाझा सीताबर्डी येथे तयार केला आहे. परंतु येथे कार पार्किंगच्या नावावर मनमानी वसुली केली जात आहे. कार पार्किंग प्लाझाला लागून असलेल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या कारचालकांना सुद्धा प्लाझामध्येच कार पार्क करण्यासंदर्भात प्राथमिकता दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकमत चमूने शनिवारी या परिसराची पाहणी केली तेव्हा हा सर्व प्रकार लक्षात आला. लोकमत चमू जेव्हा एनआयटीच्या कार पार्किंग प्लाझासमोर पोहोचली तेव्हा प्लाझासमोर थांबणाऱ्या कारचालकांना तेथील गार्ड हटवित होता. येणाऱ्यांची विचारपूस केली जात होती. या प्लाझाच्या बाजूलाच मल्टीप्लेक्स आणि मॉल आहे. त्यामुळे अनेकजण येथे कारने येतात. मल्टीप्लेक्ससमोर कार पार्कचे शुल्क केवळ २० रुपये आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास सोसावा लागतो. प्लाझाचे गार्ड त्याला गाडी नेऊच देत नाहीत. लोकमत चमूने कार पार्किंग प्लाझासमोर सकाळच्या वेळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याशी संवाद साधला असता त्याने सांगितले की, ही हॉटेलची कार पार्किंग आहे. तुम्ही हॉटेलात आले आहात का. गाडी पार्क करायची असेल तर सांगा. आम्ही त्यांना येथे किती मुले काम करतात अशी विचारणा केली. त्यावर तो कर्मचारी म्हणाला काम काय आहे ते सांगा. कुणाला कामावर ठेवायचे आहे का? त्याला ड्रायव्हिंग यायला हवे आणि १२ तास काम करावे लागेल. यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमरास पार्किंग प्लाझाच्या काऊंटरवर हॉटेलचा एक कर्मचारी बसला होता. त्याच्याकडे गेलो तेव्हा त्याने काय काम आहे, अशी विचारणा केली. पार्किंग शुल्काबाबत विचारले असता त्याने सरळ १०० रुपये शुल्क सांगितले. यानंतर तो हॉटेलमध्ये आलेल्या लोकांच्या कार पार्क करण्याच्या कामाला लागला. येथील पार्किंग प्लाझामध्ये जो काही प्रकार सुरू होता, तो प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर येथे कंत्राटदाराची मनमानी सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच याला अधिकाऱ्यांची सुद्धा साथ असल्याची शंका नकारता येत नाही. (प्रतिनिधी)टेंडर काढणार सध्या कार पार्किंग प्लाझा प्रायोगिक तत्त्वावर संचालित आहे. याचे टेंडर काढले जाईल. कार पार्किंगचे शुल्क नासुप्रतर्फे निश्चित केले जाईल. याचे नियमितपणे निरीक्षण केले जाते. -पंकज अंभोकर , अभियंता , नासुप्र तीन वर्षांपूर्वी बनले पार्किंग प्लाझा७२ कार होऊ शकतात पार्क६० पार्किंग स्पॉट नासुप्रला आणि १२ डेव्हलपरला वितरित करण्यात आले आहे. टेंडर व्हायचे आहे कार पार्किंग प्लाझा आणि याला लागून असलेली व्यावसायिक प्रतिष्ठाने एकाचवेळी लीजवर देण्यात आली, सध्या ती सुरू आहेत. परंतु कार पार्किंग प्लाझासाठी आतापर्यंत स्वतंत्रपणे टेंडर देण्यात आलेले नाही. नासुप्रचे अधिकारी यासंबंधात स्पष्टपणे काहीही सांगत नाहीत. एका स्थानिक बिल्डरला बीओटी तत्त्वावर याचे कंत्राट देण्यात आले आहे. बळजबरीने हटविले जाते अतिक्रमण कार पार्किंग प्लाझा परिसरातील अतिक्रमण बळजबरीने हटविले जाते. परिसरातील हॉटेल संचालकांकडून असाच प्रकार काही दिवसांपूर्वी दिसून आला. येथील रस्त्यांवरील ठेल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाला सूचित करण्यात आले होते, तरीही त्यांनी स्वत:च अतिक्रमण हटविले. सीताबर्डी पोलीस ठाण्यात पुरीभाजी व चाट विक्रेत्यांनी या प्रकरणी सामानाला नुकसान पोहोचवण्याची तक्रार सुद्धा दाखल केली होती.