शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

अभ्यासावर वडिलांचे नव्हे आईचेच लक्ष

By admin | Updated: June 26, 2014 00:57 IST

साधारणत: गणित, विज्ञान यासारख्या विषयांबद्दल वडील मुलांना मार्गदर्शन करताना दिसून यायचे. परंतु बदलत्या जीवन पद्धतीसोबतच हे चित्रदेखील बदलते आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांपेक्षा आईचेच

पालकांची कसरत : स्पर्धेच्या ओझ्यामुळे विद्यार्थी झाले व्यस्तनागपूर : साधारणत: गणित, विज्ञान यासारख्या विषयांबद्दल वडील मुलांना मार्गदर्शन करताना दिसून यायचे. परंतु बदलत्या जीवन पद्धतीसोबतच हे चित्रदेखील बदलते आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांपेक्षा आईचेच जास्त लक्ष असल्याची बाब ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करणाऱ्या महिलांच मुलांच्या अभ्यासाची जास्त जबाबदारी घेत असल्याचे यातून स्पष्ट होते.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांबरोबर त्यांच्या पालकांचीही कसरत होत आहे, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. घरात वडिलांना पूर्ण वेळ देता येत नसल्यामुळे आपल्या पाल्याची जबाबदारी नकळत आईवर येऊन पडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. त्यामुळे शाळेतील शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीही लावली जाते तसेच अनेक आईवडील मुलांचा घरीही अभ्यास घेतात. मात्र, पालक म्हणून ही दोघांचीही समान जबाबदारी असताना मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या शिक्षणाकडेही आईलाच लक्ष द्यावे लागते. त्यांचा गृहपाठ करून घेणे, त्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी ती प्रयत्न करीत असते. परंतु, काही वेळा बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणे पालकांना कठीण जाते. त्यामुळे पालक खासगी शिकवण्या लावण्याला प्राधान्य देतात. सर्वेक्षणामध्ये तब्बल ३७ टक्के मुलांच्या बाबतीत असे आढळून आले, की मुलांचे आईवडील नोकरी करतात. तर, ४१ टक्के मुलांचा अभ्यासही आईला घ्यावा लागतो. मुलांचा अभ्यास घेण्यात केवळ १५ टक्के वडील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मिळून अभ्यास घेणाऱ्या पालकांची टक्केवारी ३५ टक्के आहे. सर्वेक्षणामध्ये सुमारे ९ टक्के मुलांचा अभ्यास घरी कुणीही घेत नसल्याचेही दिसून आले. या मुलांना शाळा आणि खासगी शिकवणीमधील अभ्यासावरच अवलंबून राहावे लागते. (प्रतिनिधी)