शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पॅरामेडिकलचे विद्यार्थी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:32 IST

‘बॅचलर आॅफ पॅरामेडिकल टेक्नालॉजी’ (बीपीएमटी) पदवी अभ्यासक्रमाला वाव मिळत नसल्याचे कारण देत शासनाने या नावात बदल करुन ‘बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नालॉजी’ला मंजुरी देण्यात आल्याने याचा फटका ....

ठळक मुद्दे‘बीपीएमटी’ विषयालाच प्राधान्य देण्याची मागणी : मोर्चा, निदर्शने करून वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘बॅचलर आॅफ पॅरामेडिकल टेक्नालॉजी’ (बीपीएमटी) पदवी अभ्यासक्रमाला वाव मिळत नसल्याचे कारण देत शासनाने या नावात बदल करुन ‘बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नालॉजी’ला मंजुरी देण्यात आल्याने याचा फटका ‘बीपीएमटी’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. गुणवत्ता असूनही विद्यार्थी पदभरतीपासून दूर आहेत. यामुळे ‘बीपीएमटी’ विषयालाच प्राधान्य द्या, या मागणीला घेऊन नागपूर मेयो, मेडिकल, अकोला व यवतमाळ मेडिकलमधील ६०० वर पॅरामेडिकल विद्यार्थी मंगळवारपासून संपावर गेले.पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने मागण्यांना घेऊन आज सकाळी अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे-आंदोलन केले. त्यानंतर संविधान चौकापर्यंत मोर्चा काढून नारे-निदर्शने केली. येथून पोलिसांच्या मदतीने मुख्यमंत्री सचिवालयात मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित अधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय गायधने यांनी सांगितले.‘लोकमत’शी बोलताना गायधने म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात पाठीचा कणा मानला जाणारा निमवैद्यकीय तंत्रज्ञाची (पॅरामेडिकल टेक्नालॉजिस्ट) भूमिका महत्त्वाची असते. या अभ्यासक्रमाला वाव मिळण्यासाठी २०१० पासून ‘बीपीएमटी’ हा पदवी अभ्यासक्रम महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरू करण्यात आला. राज्यातून दरवर्षी पाच हजार विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू नोकरीच्या शोधात आहे. परंतु राज्य शासनाने या पदवी अभ्यासक्रमाला मान्यताच दिली नाही. तसेच कोणत्याही शासकीय व जिल्हापातळीवर पदे भरती रोजगाराच्या शैक्षणिक अर्हताबाबत उल्लेखही केला नाही. ‘बीपीएमटी’ पदवी अभ्यासक्रमाला कोणत्याही प्रकारचा वाव नसल्याने नावात बदल करून ‘बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नालॉजी’ करण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी महत्त्वाचे असलेले ‘अ‍ॅनाटॉमी’, ‘पॅथालॉजी’, फार्मोकॉलॉजी’ व ‘बायोकेमेस्ट्री’ हे विषय विद्यार्थी घेऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करतात. परंतु रिक्त जागेवर पदभरती करताना २०११ च्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्हता भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्रात ‘बीएससी’ व माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांच्या पात्रतेवर करून घेतात. याचाच फटका अनेक विद्यार्थ्यांना बसत आहे.मंत्र्यांपासून अधिकाºयांचे दुर्लक्षया समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांपासून ते अधिकाºयांपर्यंत निवेदन देण्यात आले. परंतु आश्वासनापलीकडे हाती काहीच लागले नसल्याने संपाचे हे हत्यार उपसावे लागले, असेही गायधने म्हणाले. या मोर्चाला भारतीय कामगार संघटनेचे जिल्हा संघटक बंडू तळवेकर यांनी पाठिंबा दिला. मोर्चाचे नेतृत्व अक्षय गायधने, उपाध्यक्ष किरण वर्धने, सचिव ग्रोशील टेंभुर्णे, कीर्तीवंत सिन्हागडे यांनी केले.१४ आॅक्टोबरपर्यंत संपगायधने म्हणाले, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील पॅरामेडिकलचे सर्व विद्यार्थी १० ते १४ आॅक्टोबरपर्यंत संपावर जातील. त्यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सर्व विद्यार्थी नागपुरात बेमुदत उपोषणाला बसतील.