शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

समांतर सेतू कार्यालय पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:33 IST

जुना फुटाळा परिसरातील बनावट समांतर सेतू कार्यालय चालविणाºयाच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. तेथे तयार करण्यात येणारी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणेही पोलिसांनी जप्त केली.

ठळक मुद्देविविध बनावट प्रमाणपत्रे, स्टॅम्प जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना फुटाळा परिसरातील बनावट समांतर सेतू कार्यालय चालविणाºयाच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. तेथे तयार करण्यात येणारी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणेही पोलिसांनी जप्त केली. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली ही कारवाई मंगळवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती, हे विशेष!अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरस्वती अशोक सहारे राहतात. त्यांच्याकडे त्यांचा भाऊ नितीन ईश्वर वासनिक (वय २८, रा. संजयनगर, ट्रस्ट लेआऊट, अंबाझरी) राहतो. तो मूळचा देवलापार, ता. रामटेक येथील रहिवासी आहे. प्रारंभी तो जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय परिसरात छोटी-मोठी कामे करायचा.या भागातील दलालांच्या संपर्कात आल्यानंतर नितीन वासनिकने बनावट प्रमाणपत्रे तयार करवून घेण्याचे तंत्र शिकले. त्यासाठी लागणारे विविध सरकारी कार्यालयातील रबर स्टॅम्प बनवून घेतले. संगणक, स्कॅनर, प्रिंटर विकत घेतले. त्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या घरात समांतर सेतू कार्यालय सुरू केले. तेथून ड्रायव्हिंग लासन्सस, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, लिव्हिंग, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, इन्श्युरन्स, इन्कम सर्टिफिकेट, शपथपत्र, जन्म-मृत्यू दाखले तयार करू लागला. तो आणि त्याचे साथीदार शासन आणि नागरिकांची फसवणूक करून त्यांना सर्रास हे बनावट प्रमाणपत्र अनेक दिवसांपासून देत होते. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-१ला ही माहिती कळाल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी सहारेच्या घरी छापा घातला. पोलिसांना तेथे मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणे, रबरी स्टॅम्प आढळले. पोलिसांनी ते सर्व जप्त केले.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त (डिटेक्शन) संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, संजय चव्हाण, राजकुमार देशमुख, हवालदार सुनील चौधरी, अफसरखान पठाण, राजेंद्र सेंगर, नायक अमित पात्रे, राहुल इंगोले, मंगेश मडावी आणि नीलेश वाडेकर यांनी ही कामगिरी बजावली.त्यांचे काय?पोलिसांनी ही बनावट कागदपत्रे जप्त केली. शिवाय यात नितीन वासनिकसह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलीस अटक करतील. मात्र, ज्या शेकडो नागरिकांनी ही बनावट कागदपत्रे यांच्याकडून घेतली आणि ती शाळा-महाविद्यालयासह विविध कार्यालयात दिली, त्यांचे काय होणार, असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.