शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी; कोरोना संसर्गाच्या भीतीतही सोडवला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:13 IST

Nagpur News महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा अखेर रविवारी पार पडली. नागपुरात परीक्षार्थ्यांनी कोरोना संसर्गाच्या भीतीतही पेपर सोडवला.

ठळक मुद्देएमपीएससीच्या परीक्षेत २८ टक्के परीक्षार्थी अनुपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा अखेर रविवारी पार पडली. नागपुरात परीक्षार्थ्यांनी कोरोना संसर्गाच्या भीतीतही पेपर सोडवला. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर कोरोनाच्या भीतीपासून मुक्त ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या.

येथे विद्यार्थ्यांसाठी मास्क, हॅण्डग्लोव्हज्, सॅनिटायझर देण्यात आले होते. यासोबतच एमपीएससीतर्फे जारी गाईडलाईननुसार बैठक व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना संसर्गित व कोविडची लक्षणे असलेल्या परीक्षार्थ्यांसाठी सुद्धा स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह पीपीई किटचीही व्यवस्था ठेवण्यात आली होती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार शहरात कुठल्याही केंद्रावर कोविड रुग्ण किंवा लक्षणे असलेला एकही विद्यार्थी आला नाही. बहुतांश केंद्रांवर परीक्षार्थ्यांची उपस्थिती ७० ते ७२ टक्के राहिली. काही परीक्षा केंद्रांवर ८० ते ९५ टक्के इतकी उपस्थिती होती. केंद्रांवर दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही सत्रातील परीक्षा शांततेत पार पडली. कुठल्याही केंद्रावर अनुचित घटनेची तक्रार मिळाली नाही. पेपर सोडविल्यानंतर केंद्रातून बाहेर पडलेल्या काही परीक्षार्थ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अनेकदा ही परीक्षा रद्द झाली. त्यामुळे निराशा निर्माण झाली होती. तसेच तणावही होता. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने परीक्षा घेण्यात आली. परंतु पूर्वीसारखा उत्साह नव्हता. पेपर चांगला सोडवला. आता निकालच सांगेल की पेपर कसा गेला. परीक्षा केंद्रांवर करण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपायांवर परीक्षार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, केंद्रावर येण्यापूर्वी त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. कोरोना संसर्गाची भीतीही होती. परंतु केंद्रावर केलेल्या सुरक्षेच्या व्यवस्थेमुळे समाधान वाटले.

पोलिसांनी केले सहकार्य

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. यामुळे परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी त्रास सहन करावा लागेल, अशी परीक्षार्थ्यांना शंका होती. त्यांची ही चिंता लक्षात घेऊन एक दिवसापूर्वीच वाहतूक पोलीस विभागातर्फे परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, असा विश्वास देण्यात आला होता. रविवारी हा विश्वास सार्थही ठरला. परीक्षेसाठी जाणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्र दाखवताच कुठलीही विचारपूस न करता जाऊ देण्यात आले. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी वेळेवर पोहोचले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा