शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी

By admin | Updated: October 22, 2015 04:35 IST

५९ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यासाठी दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजली आहे. दीक्षाभूमीवरील तयारी पूर्ण

नागपूर : ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यासाठी दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजली आहे. दीक्षाभूमीवरील तयारी पूर्ण झाली असून प्रशासनासोबत सामाजिक संघटना व कार्यकर्तेही दरवर्षीप्रमाणे सेवेसाठी सज्ज झाले आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी सामाजिक संघटनाही सज्ज झाल्या आहेत.सहकार्यासाठी बार्टीचे २०० स्वयंसेवकधम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातील लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यातील बरेच लोक खेड्यापाड्यातील असतात. दीक्षाभूमीवर मिळणाऱ्या सोयीसुविधांची त्यांना माहिती नसते. अशा वेळी या परिसरात फिरणारे बार्टीचे ‘स्वयंसेवक’ लोकांच्या मदतीसाठी धावून येतात. बार्टीचे २०० विद्यार्थी यावेळी दीक्षाभूमीवर लोकांना सेवा आणि मार्गदर्शन देत आहेत.बार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. बार्टीची एक शाखा नागपुरातही आहे. येथील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून दरवर्षी दीक्षाभूमीवर लोकांच्या मदतीसाठी फिरत असतात. शशांक सोमकुवर आणि विशाल कांबळे यांच्या मार्गदर्शनात यावर्षीही २०० स्वयंसेवक या परिसरात सेवा देत आहेत. हे स्वयंसेवक मुख्य सोहळ्याच्या दिनाच्या आधी संपूर्ण परिसर फिरून येथे विविध प्रकारची सेवा देणाऱ्या संस्थांची माहिती घेतात. यात मेडिकले केअर सेंटर, मदत केंद्र, पोलीस मदत केंद्र, पाण्याची, जेवणाची व्यवस्था आणि इतर सर्व सुविधा कोणत्या ठिकाणी मिळते, याची अचूक माहिती गोळा केली जाते. संपूर्ण परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बार्टीतर्फे ९ स्टॉल लावण्यात आले असून प्रत्येक स्टॉलवर २५ स्वयंसेवक तैनात ठेवले आहेत. मुख्य सोहळ््याच्या दिवशी अलोट गर्दी उसळलेली असते. या गर्दीत बार्टीचे स्वयंसेवक दिवस-रात्र फिरत असतात. गर्दीमध्ये वेळेवर कुणाला कोणतीही मदत लागली, तर हे स्वयंसेवक धावून येतात. संबंधित व्यक्तीला त्याला आवश्यक असलेल्या ठिकाणी पोहचविले जाते. दीक्षाभूमीवर याच कार्यासाठी फिरत असलेल्या प्रिती फुलझेले, रसिका रंगारी, प्रिया बागडे, प्रियंका उमरे, अपेक्षा नाईक या विद्यार्थिनींनी बार्टीच्या कार्याबाबत माहिती दिली. बाबासाहेब आमची प्रेरणा आहेत. त्यांच्या नावाने येणाऱ्या लोकांना आपल्याकडून थोडीशी मदत व्हावी यासाठीच हे तरुण स्वयंसेवक झटत आहेत. मनपाचे नियंत्रण केंद्र धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने २१ ते २४ आॅक्टोबरदरम्यान दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा व्हावी, यासाठी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेने नियंत्रण व मार्गदर्शन केंद्र सुरू के ले आहे. महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी या केंद्राचे उद््घाटन केले. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, झोन सभापती जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक संजय बोंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, सहायक आयुक्त राजेश कराडे, राजू भिवगडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य सुधीर फुलझेले, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, अग्निशमन स्थानाधिकारी एस.के.काळे, सहायक स्थानाधिकारी के.आर.कोठे, सुनील राऊ त आदी उपस्थित होते.दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही, याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाभावनेतून काळजी घ्यावी. नियंत्रण व मार्गदर्शन केंद्र २३ आॅक्टोबरपर्यंत २४ तास सुरू राहणार आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची नावे व मोबाईल क्रमांक असे, गजानन वराडे ९८२३८६६०५९, ओ.पी. लाकडे ९८२३३८९९७७, ए.डी.चौराजकर ९८२३०२२७१७, राहुल वारके ९८२३१२६४८९, आनंद खोडसकर ९८२३३१३११२, डी.पी.टेंभेकर ९८२३२४५६७१, डॉ. प्रदीप दासरवार ७०२८०९८६६९, डॉ. एम.आर.गणवीर ९८२३०६३९५२, सचिन फाटे ९९२१८८१९४१, जी.एम.तारापुरे ९८२३०९२१७५, जैस्वाल ९८२३१७२९०१, खत्री ९८२३११७३१३,जाधव ९८२३१२८२६७, संजय गायकवाड ९८२३०५९३५८ व के.डी.पडेगावकर ९७६४४४८९९५ आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)