शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी साखरेमुळे कारखानदारांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:20 IST

सरकारने साखरेवरील आयात कर ५० वरून १०० टक्के केल्यानंतरही भारतात पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात साखर आयात होत असल्याने कारखानदारांना फटका बसणार आहे.

- सोपान पांढरीपांडे नागपूर : सरकारने साखरेवरील आयात कर ५० वरून १०० टक्के केल्यानंतरही भारतात पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात साखर आयात होत असल्याने कारखानदारांना फटका बसणार आहे.सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह ठाणे जिल्ह्यातील दहिसर-मोरी गावातील व्हिडी लॉजिस्टिक्सच्या गोदामावर हल्लाबोल आंदोलन केले. पाकिस्तानातील चिस्तियन व लालूवल्लू या ब्रँडच्या साखर साठ्याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर टाकला. ‘लोकमत’शी बोलताना आव्हाड म्हणाले की, ही साखर मुंबईच्या सुकुमार एक्स्पोर्ट इम्पोर्टस् कंपनीने आयात केलेल्या ४७०० टन साखर साठ्यापैकी आहे. ही साखर भारतात कशी आली, त्याची चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. यापूर्वीही पाकिस्तानी साखर नवी मुंबई व पंजाब, हरियाणामधील गावांमध्ये उपलब्ध असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर झळकल्या आहेत.इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित पवार म्हणाले, ही साखर आयात कर वाढण्यापूर्वी आलेली असावी अशी शक्यता आहे. भारतीय साखरेपेक्षा एक ते दोन रु. प्रति किलो ती स्वस्त विकली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कारखानदारांवर दबाव आणला आहे. कारखानदारांना घाऊक व्यापाºयांना साखर २४ ते २५ रुपये किलो दराने विकावी लागत आहे. साखरेचा उत्पादन खर्च ३२ ते ३४ रुपये किलो येतो. तीन महिन्यांपूर्वी साखरेचे किरकोळ दर ४० ते ४२ रुपये होते. ते आता ३६ ते ३८ रुपयांवर आले आहेत. पाकिस्तानी साखरेमुळे प्रत्येक कारखान्याला किलोमागे ९ ते १० रुपये नुकसान सहन करावे लागत आहे. भारतातील ४९३ साखर कारखानदारांना अशा तºहेने २२ हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता पवार यांनी बोलून दाखविली.पाकिस्तानात साखरेचा उत्पादन खर्च १८ रुपये प्रति किलो आहे. १०० टक्के आयात करानंतर किलोमागे साखर ३६ ते ४० रुपयांत पडेल. त्यामुळे ही साखर कशी आली हे शोधणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी सरकारने चौकशी करून ही आयात बंद केली पाहिजे, असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचाक डॉ. अबिनाश वर्मा यांनी सांगितले.भारतात गेल्या वर्षीची ४.५० दशलक्ष टन साखर शिल्लक आहे. यावर्षी आतापर्यंत ३१ दशलक्ष टन साखर तयार झाली आहे. त्यामुळे एकूण उपलब्धता ३५.५० दशलक्ष टन झाली आहे. त्या प्रमाणात मागणी फक्त २५ दशलक्ष टनाची असल्याने देशात १० दशलक्ष टन अतिरिक्त साखर उत्पादन झाले आहे.>ठाण्यात हल्लाबोलसोमवारी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह दहिसर-मोरी येथील गोदामांवर हल्लाबोल करून पाकिस्तानातून आलेल्या दोन हजार मेट्रीक टन साखरेपैकी काही गोण्यांवर ‘हल्लाबोल’ आंदोलन करून ती नष्ट केली.