शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान आण्विक हल्ल्याचा मूर्खपणा करणार नाही

By admin | Updated: September 30, 2016 03:20 IST

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे.

माजी सैन्य अधिकाऱ्यांचे मत : मानसिक युद्ध, फिदायीन हल्ल्यांवर राहील भरनागपूर : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. जर दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले तर पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु माजी सैन्य अधिकाऱ्यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. जर पाकिस्तानने आण्विक हल्ला केला तर प्रत्यक्षात भारतापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होईल. याची पाकिस्तान सैन्याला जाणीव आहे. त्यामुळे ते असे पाऊल उचलण्याचा मूर्खपणा करणार नाही, असे मत भारतीय सैन्याच्या माजी सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.मुळात पाकिस्तानचा भ्याड व छुपे हल्ले करण्यावर भर असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो मी नव्हेच असे दाखविण्यासाठी ही त्यांची रणनीती आहे. जर युद्ध पेटलेच तर पाकिस्तान अण्वस्त्र वापरण्याची चूक करणार नाही. जर त्यांनी असे केले तर भारताचा काही भाग नष्ट होईल. परंतु प्रत्युत्तरात संपूर्ण पाकिस्तान बेचिराख होईल. भारताचे कमी व पाकिस्तानचेच जास्त नुकसान होईल, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले. थेट हल्ला करण्यापेक्षा पाकिस्तान दहशतवादी हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेवरदेखील पुढील काही काळ विशेष लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.चीनलादेखील बसेल फटकाजर पाकिस्तानने अण्वस्त्रांचा उपयोग केला तर त्याचा फटका चीनलादेखील बसेल. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी चिनी कामगार विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. शिवाय अण्वस्त्रांमुळे होणाऱ्या किरणोत्सर्गाचा फटका चीनलादेखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच पाकिस्तानला असे पाऊल उचलू देणार नाही, असे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)