शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पेंटरला सात वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: May 3, 2017 02:32 IST

एका २५ वर्षीय मजूर महिलेवरील अत्याचारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने

सत्र न्यायालय : मजूर महिलेवरील अत्याचार प्रकरण नागपूर : एका २५ वर्षीय मजूर महिलेवरील अत्याचारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने एका आरोपी पेंटरला सात वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राहुल गौतम जगताप (३२) असे आरोपीचे नाव असून, तो हुडकेश्वर रोड सेंट पॉल शाळेजवळील श्यामनगर येथील रहिवासी आहे. अत्याचाराची ही दुर्दैवी घटना १२ डिसेंबर २०१२ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली होती. खटल्याची पार्श्वभूमी अशी, घटनेच्या वेळी बेसा येथे ‘व्यंकटेश सिटी हेरिटेज सी’नावाच्या अपार्टमेंटचे बांधकाम सुरू होते. या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर पीडित महिला साफसफाईचे काम करीत होती. या ठिकाणी पेंटर राहुल जगताप हा आला होता. त्याने या महिलेला गुंगीचे औषध असलेला खर्रा खाण्यास दिला होता. खर्रा खाताच पीडित महिलेला गुंगी येऊन ती बेशुद्ध झाली होती. त्याबाबतचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित महिलेवर अत्याचार केला होता. ती शुद्धीवर येताच तिने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ३७६, ३२८ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक पंकज घाडगे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यांसह न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३७६ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड, भादंविच्या ३२८ कलमांतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील दीपक कोल्हे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत कावळे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल मुकुंदा जयस्वाल, रविकिरण भास्करवार, नायक पोलीस शिपाई अनिल दोनाडकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)