शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध, जखमी श्वानांच्या वेदना सरकारच्या कानावरच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:08 IST

नागपूर : प्रामाणिक प्राणी कोणता, असा प्रश्न विचारताच एकच नाव ओठावर येते, ते म्हणजे कुत्रा ! कुटुंबाचा सदस्य होऊन ...

नागपूर : प्रामाणिक प्राणी कोणता, असा प्रश्न विचारताच एकच नाव ओठावर येते, ते म्हणजे कुत्रा ! कुटुंबाचा सदस्य होऊन सेवा बजावणाऱ्या या प्राण्याचा वृद्धापकाळ मात्र बऱ्याचदा कष्टदायक असतो. मालक काळजीवाहू आणि संवेदनशील असला तर ठीक, अन्यथा आयुष्याच्या अखेरच्या दिवसात सेवा देण्यात सक्षम नसल्यावर हा प्रामाणिक जीव मात्र निराधार होतो. अशी अनेक कुत्री आज कष्टात जगत असली तरी त्यांच्या वृद्धापकाळातील वेदना अद्यापतरी सरकार किंवा श्वानप्रेमींनी ऐकलेल्या दिसत नाहीत.

नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या ८० हजार तर पाळीव कुत्र्यांची संख्या ३५ हजार आहे. मात्र शासनाच्या वतीने चालविले जाणारे डॉग शेल्टर कुठेच नाही. शासनाची प्राणी क्लेश निवारण समिती अस्तित्वात असून जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतात. मात्र तक्रार आल्यावर निराकरण करण्यापलीकडे या समितीचे फारसे काम दिसत नाही. केंद्राच्या अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या माध्यमातून वृद्ध आणि विकलांग कुत्र्यांच्या संगोपनासाठी प्रस्ताव दाखल करून रुग्णालय आणि शेल्टर हाऊस उभारले जाऊ शकते. मात्र अद्याप तरी असा प्रस्ताव प्रशासनाकडून गेलेला नाही.

नागपूर महापालिकेने २०१२ मध्ये भांडेवाडी येथे जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी अ‍ॅनिमल सेंटरची स्थापना केली. येथे दोन डॉक्टरांची नियुक्ती असून अपघातामध्ये जखमी झालेले कुत्रे, डुकरे आणि मांजरींची शुश्रूषा केली जाते. उपचारानंतर सोडले जाते. येथे ३० ते ३५ कुत्र्यांना दाखल करून घेण्याची क्षमता आहे. मात्र वृद्ध, विकलांग कुत्र्यांना कायमस्वरूपी ठेवण्याची व्यवस्था नाही.

पशू क्रूरता निवारण समितीच्या वतीने गिट्टीखदान परिसरात डॉग सेल्टर आहे. सुरेंद्र अरोरा हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सहसचिव तरुण मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे वृद्ध आणि विकलांग कुत्र्यांना कायमस्वरूपी ठेवण्याची व्यवस्था आहे. अशा कुत्र्यांच्या अन्नासाठी व संगोपनासाठी त्यांच्या मालकांकडून देखभाल खर्च घेऊन आयुष्यभर शुश्रूषा केली जाते. येथे सध्या ३४ वृद्ध कुत्री असून १० पिले आहेत. ॲनिमल वेलफेअर बोर्डाने या संस्थेला निधीही दिला आहे. या सोबतच स्मिता मिरे यांच्यामार्फतही शहरात बेवारस व जखमी कुत्र्यांसाठी शेल्टर हाऊस चालिवले जाते.

प्रस्ताव तयार

महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांवर उपचारासाठी आणि सेल्टर होम उभारण्यासाठी मनपाने १२ ते १३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. अद्याप तो सादर झालेला नाही. सध्याचे भांडेवाडीतील रुग्णालय तात्पुरते असून, त्याचा खर्च महानगरपालिकेच्या वतीने चालविला जात आहे.

मागील बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. मात्र, कोरोनामुळे विषय पुढे सरकला नाही. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप असा प्रस्ताव गेलेला नाही. मात्र, प्रयत्न सुरू आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल.

- रवींद्र ठाकरे

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा प्राणी क्लेश निवारण समिती, नागपूर

नागपुरात एसपीसीए (सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रूव्हेल्टी ॲनिमल्स) स्थापन करण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू आहे. धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. शासनाकडून फंड आल्यावर व जागा मिळाल्यावर सेल्टर उभारणीच्या दृष्टीने काम सुरू होईल.

- डॉ. मंजूषा पुंडलिक

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सचिव, जिल्हा प्राणी क्लेश निवारण समिती, नागपूर

...