शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

निराशारसाची निर्मिती करणारे नाट्य ‘पै पै आणि पै’

By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST

नाट्य रसिकांच्या विशेष प्रतीक्षा आणि अपेक्षेच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या दीपरंग नाट्य महोत्सवाला आज प्रारंभ करण्यात आला.

अ. भा. मराठी नाट्य परिषद : दीपरंग महोत्सवाला प्रारंभनागपूर : नाट्य रसिकांच्या विशेष प्रतीक्षा आणि अपेक्षेच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या दीपरंग नाट्य महोत्सवाला आज प्रारंभ करण्यात आला. नाट्य कलावंतांना राज्य नाट्य स्पर्धेत नाटक सादर करण्यापूर्वी रंगमंचावर होणाऱ्या चुका कळाव्या म्हणून हा महोत्सव परिषदेतर्फे आयोजित करण्यात येतो. या महोत्सवातील पहिलेच नाट्य मात्र रसिकांना निराश करणारे होते, हे खेदाने नमूद करावे लागते. सायंटिफिक सभागृहात या महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. उद्घाटन अ. भा. मराठी नाट्य परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, उपाध्यक्ष अजय पाटील, कार्याध्यक्षा श्रद्धा तेलंग, प्रकल्प संयोजक अ‍ॅड. रमण सेनाड, ज्येष्ठ दिग्दर्शक मदन गडकरी, सुप्रसिद्ध सिने कलावंत नरेंद्र शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.प्रमोद भुसारी यांनी महोत्सवाच्या उद्घाटनाची घोषणा केली, तसेच सर्व सहभागी कलावंतांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर रसिकरंजन आणि रंजन कला मंदिर यांच्यातर्फे ‘पै पै आणि पै’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. कवडीचुंबक व्यक्तीच्या पैपै जोडण्याच्या अतिरेकी हव्यासाच्या गमतीजमतीमुळे घडणाऱ्या प्रसंगांचे मूळ विनोदी आशयाचे हे नाटक एकूणच सुमार दर्जाच्या सादरीकरणाने रसिकांना निराश करणारे झाले. अप्पा लाखे या कवडीचुंबक मास्तरांना १० लाखाची लॉटरी लागते. त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी सारेच त्यांना चिकटतात. पण चलाख अप्पा कुणाचीही डाळ शिजू देत नाही. नाटकातील प्रसंग आणि कलावंतांचे सादरीकरण प्रारंभापासूनच रसिकांची पकड घेण्यात अयशस्वी ठरले. अपेक्षित विनोदापासून भरकटलेले किंबहुना विनोदाचा इनोद झालेल्या या नाट्याने अपेक्षाभंग केला. लेखक श्याम फडके, दिग्दर्शक संजय पेंडसे तर निर्मिती सूत्रधार निरंजन कोकर्डेकर व ज्योती कोकर्डेकर होते. अप्पांच्या भूमिकेत निरंजन कोकर्डेकर यांच्यासह रोहिणी फाटक, अशोक शहापूरकर, संजय वानकर, संजीव जैन, उदय कोकर्डेकर, अभिलाष भुसारी, मधुरा टेंभूर्णीकर, अजिंक्य देव यांनी यात भूमिका केल्या. तांत्रिक बाजू निर्भय जोशी, बाबा खिरेकर, ओंकार मुळे, ललित घवघवे, राजेश मखे, राहुल महाजन यांनी सांभाळल्या. स्पधेचे परीक्षण जगन्नाथ राठोड, प्रकाश पात्रीकर, कीर्ती मालेगावकर करीत आहेत.(प्रतिनिधी)