शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी पचेरीवाला (३)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST

नागपूर : नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या ८३ व्या आमसभेत अध्यक्षपदी विष्णूकुमार पचेरीवाला यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर ...

नागपूर : नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या ८३ व्या आमसभेत अध्यक्षपदी विष्णूकुमार पचेरीवाला यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिवपदी तरुण निर्बाण यांची निवड झाली.

गुलाबचंद पचेरीवाला आणि अ‍ॅड. आलोक डागा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप जाजू, उपाध्यक्ष गोविंद पसारी, सहसचिव विवेक मुरारका व मितेष कटारिया आणि संचालक मंडळात विजय जयस्वाल, विपीन पनपालिया, शंकरलाल खंडेलवाल, नाथाभाई पटेल, वसंत पालीवाल, देवकीनंदन खंडेलवाल, नितीन बन्सल, संजय पांडे, गजानन वाघमारे, सुशील अग्रवाल, कमल कलंत्री, गिरीश लिलडिया, वासुदेव झामनानी, अजय पांडे, योगेश पालीवाल, रवींद्र चांडक, संदीप साबू व राजेश सोनी यांचा समावेश आहे.

विष्णूकुमार पचेरीवाला म्हणाले, व्यापारी हे केवळ व्यापारी नसून ग्राहक आणि नागरिक आहेत. व्यापाऱ्यांनी चांगल्या नागरिकाचा परिचय देताना करचोरी, भेसळ आणि अन्य अनैतिक कामापासून दूर राहावे. नागपुरातील प्रत्येक व्यापारी आणि व्यावसायिक संस्थांनी चेंबरशी जुळावे. तरुण निर्बाण यांनी गेल्या वर्षीचा अहवाल सादर केला. चेंबरचे माजी अध्यक्ष सीए कैलास जोगानी म्हणाले, कोरोनापासून बचावासाठी व्यापाऱ्यांनी मास्क लावावा आणि सॅनिटायझरचा उपयोग करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

याप्रसंगी चेंबरचे माजी अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, महेंद्र कटारिया, भगीरथ मुरारका यांच्यासह विजयकुमार धाडीवाल, रामअवतार अग्रवाल, विविध व्यापारी संघटनांचे अध्यक्ष व सचिव आणि चेंबरचे सदस्य व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन विवेक मुरारका व आभार तरुण निर्बाण यांनी मानले.