शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

‘आयआयएम-नागपूर’च्या संचालकीय मंडळ स्थापनेला वेग

By admin | Updated: November 20, 2015 03:08 IST

‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग सुरू झाले असून संस्थेला मिहान येथे जागादेखील देण्यात आली आहे.

येत्या महिन्याभरात चित्र स्पष्ट होणारनागपूर : ‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग सुरू झाले असून संस्थेला मिहान येथे जागादेखील देण्यात आली आहे. आता संस्थेसाठी संचालकीय मंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चेअरमन तसेच सदस्यांच्या नियुक्तीसाठी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित सदस्य नामनिर्देशित होईपर्यंत कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव विनय शील ओबेरॉय यांच्याकडे संचालकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता प्रभार देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या मंडळातील १५ सदस्यांमध्ये राज्य शासन, उद्योगजगत, शिक्षण क्षेत्र तसेच ‘आयआयएम’मधील तज्ज्ञांचा समावेश राहू शकतो.देशातील सर्व ‘आयआयएम’चा कारभार हा संचालकीय मंडळाच्या माध्यमातूनच चालतो. २०१३ च्या कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी लागते. संचालकीय मंडळाच्या स्थापनेशिवाय ‘आयआयएम-नागपूर’ची नोंदणी होऊ शकत नाही. त्यांनतर या मंडळाकडून संचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. संचालकच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. ही बाब लक्षात घेता ‘आयआयएम-अहमदाबाद’च्या प्रशासनाकडून सातत्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासोबत संवाद साधण्यात येत आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीने ‘आयआयएम-नागपूर’चे प्रकल्प समन्वयक ले. कर्नल (निवृत्त) मकरंद अलूर यांच्याकडे जागेचे वाटप पत्र सोपविले.संचालकीय मंडळासाठी काही नावे अंतिम करण्यात आली आहेत. येत्या महिन्याभरात चित्र स्पष्ट होईल. शिवाय ‘आयआयएम-नागपूर’च्या इमारतीचे भूमिपूजनदेखील डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊ शकते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)दर्जा कायम राखण्यावर भरसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती ही लांबलचक व वेळखावू प्रक्रिया आहे. त्यामुळे तोपर्यंत ‘आयआयएम-अहमदाबाद’ येथील तज्ज्ञ शिक्षकच येथे वर्ग घेणार आहेत. शिवाय काही ‘व्हिजिटिंग’ प्राध्यापकदेखील राहतील. ‘आयआयएम’च्या शिक्षणप्रणालीचा दर्जा कायम राहावा यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.