नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां. वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार प्रदान समारंभ बुधवार १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ७.३० वाजता होईल. पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमात ‘आजची पत्रकारिता व शासन’ या विषयावर कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक यांचे व्याख्यान होणार आहे. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षण मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा असतील.(प्रतिनिधी)
पां. वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे आज वितरण
By admin | Updated: December 16, 2015 03:10 IST