शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री व आमदारांच्या पीएंना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या लॉबीमध्ये ‘मज्जाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:13 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील सभागृह लॉबीमध्ये मंत्री व आमदारांच्या स्वीय सहायकांना (पीए) प्रवेश नाकारल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देसंतप्त आमदारांनी केला निषेध

आॅनलाईन लोकमतनागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील सभागृह लॉबीमध्ये मंत्री व आमदारांच्या स्वीय सहायकांना (पीए) प्रवेश नाकारल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे संतप्त आमदारांनी या घटनेचा निषेध करून सरकार विरोधकांना बोलू देत नाही, आता पीएंनाही प्रवेश नाकारला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्री व आमदारांच्या पीएंसोबत, प्रतिनिधींसोबत प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशानुसार मंत्री व आमदारांच्या पीएंना सभागृहाच्या लॉबीमध्ये जाण्यास रोखण्यात आले. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लेखी आदेश जारी केले. यामुळे आमदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. आ. सत्तार म्हणाले, राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीच्या अधिकाराचे हनन करणारा आणि हुकूमशाहीचे संकेत देणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री व आमदारांचे पीए लॉबीमध्ये येतात. ते सरकारचा एक भाग आहे. मंत्री व आमदारांना ते मदत करण्यासाठी येत असतात. परंतु सरकारने बोलण्यावर निर्बंध टाकले आहे. हा निर्णय लोकशाहीविरोधी आहे.भाजपच्या काही आमदारांनी भाजपचे प्रतोद सुधाकर देशमुख यांच्याकडे याबाबत तक्रार केली. सुधाकर देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आमदारांच्या पीएंना प्रवेश नाकारण्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.

टॅग्स :ministerमंत्री