शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

५० खासगी रुग्णालये मिळून उभारणार ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

राहुल लखपती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्याने, इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ ...

राहुल लखपती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्याने, इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत ही स्थिती उद्भवू नये, म्हणून विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या ५० सदस्यांनी एकत्र येऊन बुटीबोरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा प्लांट रुग्णालयांच्या सेवेत असेल.

कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरली. ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली. एका रुग्णाला दर मिनिटाला कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ७० लीटरपर्यंत ऑक्सिजन लागत होता. १७८ मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनची मागणी वाढली होती. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे व विमानाची सेवा घ्यावी लागली, परंतु रुग्णसंख्येचा उच्चांक महिन्याभरातच कमी झाल्याने मोठा धोका टळला. ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, म्हणून न्यायालयाने ५० व त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश दिले. परंतु, जागेची कमतरता व अनेक खासगी रुग्णालयांना स्वत:चे प्लांट उभारणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी ‘विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन’च्या (व्हीएचए) सदस्यांनी एकत्र येऊन बुटीबोरी एमआयडीसी येथे ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’च्या मदतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला.

- याच वर्षात प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

‘व्हीएचए’चे अध्यक्ष डॉ. अरबट म्हणाले, हा प्रकल्प याच वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकदा प्रकल्प सुरू झाल्यास खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा प्रश्न सुटेल. ‘व्हीएचए’चे समन्वयक डॉ. बी. के. मुरली म्हणाले, जागेची कमतरता असताना हॉस्पिटलच्या आवारात प्लांट उभारणे अवघड असून, खर्चिक आहे. यामुळे सदस्यांनी एकत्र येऊन हा प्लांट उभारण्यास पुढाकार घेतला आहे. यासाठी बुटीबोरी एमआयडीसीमध्ये तीन एकरची जागा उपलब्ध झाली असून, प्रकल्पासाठी ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’कडे (एमएसएमई) प्रस्ताव सादर केला आहे.

- ‘एमएसएमई’कडून ८० टक्के अनुदान

डॉ. मुरली म्हणाले, ऑक्सिजन प्लांटच्या एकूण खर्चाच्या २० टक्के (अंदाजे १२.५ कोटी रुपये) योगदान सदस्यांनी जमा केले आहे, तर ‘एमएसएमई’कडून उर्वरित ८० टक्के अनुदान मिळणार आहे.

- १५० रुग्णालयांना होणार मदत

‘व्हीएचए’चे डॉ. आलोक उमरे म्हणाले, हा प्लांट उभारण्यासाठी ५० सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. या प्लांटमधून १५० हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. शिल्लक साठा इतर रुग्णालयांना उपलब्ध करून दिला जाईल. दिवसाकाठी १,७०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची मदत या प्लांटमधून होणार आहे.