शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी अन् गरीब रुग्णांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. अशा संकटाच्या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य कार्यालय अधीक्षक खुशरु पोचा यांनी विदर्भातील मागास भागातील आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन बँक सुरू केली आहे. सध्या त्यांच्या ऑक्सिजन बँकेत ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध असून, त्याचा फायदा आदिवासी, गरीब रुग्णांना होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेने ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. यात आदिवासी आणि गरीब रुग्णांची ऑक्सिजनसाठी धावपळ होत आहे. अनेक जण ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेऊ शकत नाही. त्यासाठी खुशरु पोचा यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सोशल मीडिया, धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात त्यांना यश आले. त्यांना अबू धाबी येथून पारसी नागरिकांनी विमानाने ४० तुर्की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले. तर एका १७ वर्षाच्या मुलाने आणि ३ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोचा यांच्याकडे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचविले. यातील ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पांढरकवडा येथे, ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मेळघाटला पाठविले, तर नागपुरातील ४ गरीब रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आतापर्यंत पुरविले आहेत. शेतकरी नेता किशोर तिवारी यांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींना ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले आहेत. तसेच इतर शहरातील गरीब रुग्णांना ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवीत आहेत. गरीब रुग्ण ऑक्सिजन बँकेतून घेतलेले कॉन्सन्ट्रेटर वापरनंतर पुन्हा ऑक्सिजन बँकेत जमा करीत आहेत. आता चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा येथील आदिवासी भागात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी पाहता, आणखी ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. केवळ ऑक्सिजनचा पुरवठाच ते करीत नसून पहिल्या लॉकडाऊनपासून एक हजार स्वयंसेवकांद्वारे सेवा किचनच्या माध्यमातून त्यांनी ५० लाख रुपयांचे भोजन वितरित केले. ऑक्सिजनचा तुटवडा असताना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवून ते गरीब रुग्ण, आदिवासींचे प्राण वाचविण्याचे मोलाचे काम करीत आहेत.

............

रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक, मुख्यमंत्र्यांनी केला फोन

लॉकडाऊनमध्ये गरजूंना भोजन पुरविण्याच्या तसेच गरीब आणि आदिवासी रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याच्या खुशरु पोचा यांच्या महान कार्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कौतुक केले. रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करून पोचा करीत असलेले कार्य इतरांना प्रेरणा देणारे असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोचा यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांना फोन करून ते करीत असलेल्या समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

............