शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

ओव्हरलोडवरील कारवाईचे टार्गेट दुप्पट

By admin | Updated: July 29, 2015 02:56 IST

क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईला गती देण्यासाठी प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ..

परिवहन आयुक्त सेठी : फिटनेस व लायसन्स विभागात पारदर्शकता आणणारनागपूर : क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईला गती देण्यासाठी प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) दिलेले लक्ष्य (टार्गेट) दुप्पट केले आहे. सोबतच ओव्हरलोडवर आरटीओ आणि महसूल विभाग एकत्र कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.सेठी म्हणाल्या, वाळूच्या ओव्हरलोडवर आळा घालण्यासाठी वाळू उपसाच्या जागेवरच वजन करण्याची सोय करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात प्रस्ताव तयार करून इतरही विभागाचा यात समावेश केला जाईल. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देण्याकरिता संगणकीकृत टेस्ट ट्रॅक तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. नाशिक आरटीओ कार्यालयात प्रायोगिकस्तरावर याला सुरुवात झाली आहे. लवकरच इतरही आरटीओ कार्यालयात ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर हा ट्रॅक सुरू होणार आहे. पुढील कार्यकाळात मोटार वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), वाहनाचे फिटनेसमध्ये पारदर्शकता व शास्त्रोक्त पद्धत आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. आरटीओमध्ये आॅनलाईन लर्निंग व्यवस्थेसह ई-गव्हर्नन्समधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आधुनिकीकरणाची गरजही त्यांनी बोलून दाखविली. तसेच आरटीओ कार्यालयात छोट्यामोठ्या कामासाठी लोकांना यावे लागते. त्याऐवजी आधुनिक तंत्राने ही कामे मार्गी लावता येऊ शकतील, असे मतही त्यांनी मांडले. (प्रतिनिधी)आरटीओमध्येही लवकरच सेवा हमी कायदासरकारी काम आणि सहा महिने थांब’ या धोरणाला आळा बसण्यासाठी आरटीओमध्येही ‘सेवा हमी कायदा’ सुरू होणार आहे. सेठी म्हणाल्या, जनतेला मिळणाऱ्या सेवा या विहीत कालावधीमध्ये मिळाव्यात या उद्देशाने हे विधेयक आले आहे. या विधेयकामुळे प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता, पारदर्शकता येणे अपेक्षित आहे.मुदतीत अपॉर्इंटमेन्ट न मिळणाऱ्यांना अपार्इंटमेन्टची गरज नाहीवाहन चाचणी परीक्षेच्या अपॉर्इंटमेन्ट घेण्यासाठी तब्बल दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा फटका मुदत संपायला आलेल्या अनेक शिकाऊ परवानाधारकांना (लर्निंग लायसन्स) बसत आहे. या प्रश्नावर सेठी म्हणाल्या, ज्यांचे लर्निंग लायसन्स संपण्याच्या मुदतीत आॅनलाईन अपार्इंटमेन्ट मिळत नाही त्यांना अपार्इंटमेन्ट घेणे आवश्यक नसल्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.