शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात ८० हजारांवर मोकाट कुत्रे : व्हीटीएसचा सर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:56 IST

महापालिका प्रशासनाने व्हीटीएस फॉर अ‍ॅनिमल संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचा सर्वे केला आहे. यात नागपूर शहरात ८० हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असल्याची आढळून आले आहे.

ठळक मुद्देविभागनिहाय नसबंदी  न झालेल्यांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. मोकाट कुत्र्यांसदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी व्हीटीएस फॉर अ‍ॅनिमल संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचा सर्वे केला आहे. यात शहरात ८० हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असल्याची आढळून आले आहे.नागरी लोकसंख्येच्या तुलनेत मोकाट कुत्र्यांची संख्या सरासरी ३ टक्के असते. शहरालगतच्या भागात ती अधिक आहे. उत्तर व पूर्व नागपूर तसेच मध्य भागात कुत्र्यांची संख्या अधिक आहे. तर सिव्हिललाईन सारख्या भागात कुत्र्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. कुत्र्यांची विभाग् निहाय गणना विचारात घेता नसबंदीचा उपक्रम राबविला जात आहे.सर्वेक्षणात यापूर्वी नसबंदी करण्यात आलेले, नसबंदी न झालेले याचा वेगवेगळा डाटा तयार तयार करण्यात आला आहे. सोबत कुत्र्यांची लहान पिले व गर्भधारणा झालेली कुत्र्यांचीही माहिती संकलीत करण्यात आली आहे. त्यानुसार नसबंदीचा व्यापक कार्यक्रम राबविला जात आहे. सध्या शहरात भांडेवाडी व महाराजबाग येथे ननसबंदी केंद्र सुरू आहेत. लवकरच नसबंदी केंद्राची संख्या वाढविली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी शहरातील ७ ते ८ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. रात्रीला कामावरुन घरी परतणाऱ्यांरे कुत्र्यामुळे दहशतीत असतात. कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी व्हीटीएस फॉर अ‍ॅनिमल संस्थेने सर्वेक्षण केले आहे. या संस्थेने यापूर्वी गोवा येथील मोकाट कुत्र्यांची गणना केली आहे.साडेपाच महिन्यात ३,५०० नसबंदीशहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी प्रभागनिहाय डाटा संकलीत करण्यात आला आहे. शहरातील नसबंदी झालेले व न झालेल्या कुत्र्यांचा डाटा उपलब्ध झाला आहे. त्यानुसार नाबंदीचा उपक्रम राबविला जात आहे. मागील साडेपाच महिन्यात ३,५०० कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली आहे.डॉ. गजेंद्र महल्ले, पशुचिकित्सक महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdogकुत्रा