शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत शेतीतून ६,३९० शेतकरी समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:52 IST

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता शासनाने राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानातून वर्धा जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३९० शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचे दिसून आले आहे.

रूपेश खैरी। वर्धा : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता शासनाने राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानातून वर्धा जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३९० शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचे दिसून आले आहे. शेती शेतकऱ्यांची, तंत्रासह बियाणे आमचे; पण उत्पन्न तुमचे असे म्हणत शासनाने राज्यात हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातून शेतकऱ्यांना लागवड व पेरणीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे.या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ प्रशिक्षण देत असून त्यांच्या मार्गदर्शनातून वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १ हजार ५६० हेक्टरवर विकसित तंत्राने शेती सुरू आहे. शेतकऱ्यांकडून वापरण्यात येत असलेल्या बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचें उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडूनच दुसऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचाही प्रयोग होत आहे. यातून शेतकऱ्यांचा विश्वास वाढणार असल्याचेही कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात सहभागी शेतकऱ्यांना शासनाच्या कंपनीचे बियाणे देण्यात आले आहे. या बियाण्यावर काही शेतकऱ्यांनी अविश्वास दर्शविल्याने त्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे वापरण्याचीही मुभा देण्यात आली आहे. याची रक्कम शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अभियानात सोयाबीन व तुरीचाच पेरा च्अभियानात आतापर्यंत ४ हजार ५२५ हेक्टरवर सोयाबीन आणि १ हजार ८७५ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे. येथे बियाण्याच्या उत्पादन क्षमतेनुसार शेतकऱ्यांनी त्यांना यंदा किती उत्पन्न होईल याचा अंदाज बांधला आहे. त्यांची त्याच दिशेने वाटचालही सुरू आहे. यात शेतकऱ्यांना किती उत्पादन होणार हे हंगामाच्या अखेरीच कळणार आहे.शेतकऱ्यांची शासकीय बियाण्यांकडे पाठ च्शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना महाबीज, कृभको आणि राष्ट्रीय बीज निगमच्या बियाण्यांचा वापर करण्याच्या सूचना होत्या. मात्र शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांवर अविश्वास दर्शवित ते बियाणे वापरण्यास नकार देत ती बियाणे परत केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीची बियाणे वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या अभियानात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत त्यांच्या शेतात कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून पेरा करण्यात येत आहे. यात वापरण्यात येत असलेल्या बियाण्याच्या क्षमतेनुसार उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविण्यात येत आहे. वर्धेत या अभियानाला शेतकऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.