शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

कॉम्पोनंट ब्लडसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता

By admin | Updated: November 2, 2015 02:15 IST

एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनंट) तयार करता येतात.

मेडिकल : एफडीएची ‘होल ब्लड’ला परवानगीनागपूर : एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनंट) तयार करता येतात. म्हणजेच एका रक्तदात्याने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन रुग्णांना होऊ शकतो. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्त घटक वेगळे करणारी यंत्रणा असलीतरी दर्जा नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) ‘होल ब्लड’ला परवानगी देत ‘कॉम्पोनंट ब्लड’ला नाकारली आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांवर ‘प्लेटलेट’साठी भटकंतीची वेळ आली. मेडिकलमध्ये विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून रुग्ण येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. उपचारांदरम्यान आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियार करीत असताना रक्त व रक्तघटकाची उपलब्धता महत्त्वाची ठरते. परंतु मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर एफडीएने बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. त्यानंतर शुक्रवारी केवळ ‘होल ब्लड’चा पुरवठा करण्याची परवानगी दिली. मात्र, ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स कॉऊंट मशीन, कोअ‍ॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या त्रुटी काढत ‘कॉम्पोनंट ब्लड’ला परवानगी नाकारली. या मशीन्स उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकल प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. १५ लाखांच्या या मशीन स्थापन होण्यापासून त्यावर प्रत्यक्ष काम करण्यास आठवड्याभराचा कालावधी लागणार आहे. परंतु तो पर्यंत गरीब रुग्णांवर पदरमोड करून बाहेरून ‘कॉम्पोनंट ब्लड’ विकत घेण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण अडचणीतउपराजधानी डेंग्यूच्या तापाने फणफणली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १३० जणांना डेंग्यू झाला आहे. मात्र, याच्या दुप्पट रुग्ण सध्याच्या स्थितीत उपचार घेत असल्याची माहिती आहे. शासकीयसह अनेक खासगी इस्पितळात या रोगाचे मोठ्या संख्येत रुग्ण आहेत. या रोगासह मलेरियाच्या रुग्णांमधील रक्तातील प्लेटलेटस् झपाट्याने कमी होतात. परिणामी प्लेटलेटस्च्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु मेडिकलमध्ये ‘कॉम्पोनंट ब्लड’साठी परवानगी नाकारल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांना पदरमोड करीत खासगी रक्तपेढीतून रक्तघटक घ्यावे लागत आहे. नियमांचे उल्लंघन‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे रक्तपेढीचे ब्रीद आहे. अलीकडेच रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान शासकीय रक्तपेढीत लावण्याच्या सूचना आहेत. त्या तुलनेत मेडिकल रक्ताची सुरक्षितात तर देत नाहीच उलट ‘होल ब्लड’ देऊन नियमांचे उल्लंघन करीत आहे.