शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म उद्योगांसाठी देशात ४०० क्लस्टर्ससाठी आराखडा : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:01 IST

देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’नंतर ‘एमएसएमई’साठी प्रभावी उपाययोजना करणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योजकांनादेखील फटका बसतो आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्रात सुमारे ११ कोटी कामगार काम करतात. अनेक कामगार गावांकडे परतले आहेत. ही बाब लक्षात ठेवता देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्रीनितीन गडकरी यांनी केले. ‘पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री’च्या प्रतिनिधींसमवेत त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधला.‘कोरोना’मुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चा प्रभाव देशातील लहान उद्योगांवर पडला आहे. त्यामुळे त्या उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा संवाद साधण्यात आला. या उद्योजकांचे मनोबल कायम राहावे व आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी सूक्ष्म-लघु-मध्यम मंत्रालय पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहील. संकट संपल्यानंतर अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.यावेळी प्रतिनिधींनी उद्योगजगतातील अडचणी व चिंता मांडल्या. वीज व पाणीच्या देयकांमध्ये ठराविक शुल्क माफ करावे, काही वस्तूंना आवश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट करणे, ‘लॉकडाऊन’दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्य निर्वाह निधीतून करावे, ‘सबसिडी’च्या माध्यमातून आर्थिक संकट दूर करावे, वस्तूंच्या निर्यातीसाठी वाहतुकीमध्ये दिलासा इत्यादी उपाय त्यांनी सुचविले. या सर्व बाबी अर्थमंत्री व भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर ठेवू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.महामार्ग निर्माणाचा वेग वाढविणार‘लॉकडाऊन’मुळे वाहतूक व्यवसायाशी जुळलेल्यांचा रोजगार ठप्प आहे. हजारो ‘ट्रक्स’ थांबले असून त्यांच्यात कोट्यवधींचा माल आहे. त्यामुळे अनेकांचा नुकसान होत आहे. या सर्वांची नुकसानभरपाई कशी होईल, यावर विचार सुरू आहे. शिवाय ‘लॉकडाऊन’ संपताच महामार्ग निर्माणाच्या कार्याचा वेग वाढविण्यात येईल. त्यामुळे मजुरांची मागणी वाढेल व त्यांना लगेच काम मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्री