शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

वर्ध्यात ‘आऊट डेटेड’ बसेस रस्त्यावर

By admin | Updated: June 14, 2017 15:16 IST

राज्यातील तब्बल ४० टक्के बसेस आऊट डेटेड झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

प्रशांत हेलोंडे वर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे तब्बल १६ हजार एसटी बसेस आहेत. प्रत्येक वर्षी सुमारे एक हजार नवीन बसेसची खरेदी केली जाते व तेवढ्याच बसेस मोडित काढल्या जातात; पण मागील वर्षी महामंडळाला तोटा होत असल्याच्या नावाखाली नवीन खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी, जुन्या खिळखिळ्या झालेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. महामंडळाकडून प्रत्येक दहा महिन्यांनी नवीन बसेसची खरेदी करण्याचे धोरण होते. यात किलोमीटर आणि वर्षांचा हिशेब ग्राह्य धरून जुन्या बसेस भंगारात काढण्याचे प्रमाण ठरविले जात होते. हे प्रमाण लक्षात घेतले तर बहुतांश बसेस मोडित काढण्याच्या स्थितीत आहेत; पण नवीन बसेस उपलब्ध होत नसल्याने त्याच एसटीकडून सेवा घेतली जात आहे. राज्यातील तब्बल ४० टक्के बसेस आऊट डेटेड झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.जिल्ह्यात ९७ बसेस ‘आऊट डेटेड’वर्धा जिल्ह्यात ३१३ बसेस आहेत. यापैकी किलोमीटरचा विचार केल्यास ९७ बसेस दहा वर्षांपेक्षा अधिक काळ चालल्याचे दिसून येते. वर्षांचा हिशेब ग्राह्य धरल्यास जिल्ह्यात नऊ ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून रस्त्यावर असलेल्या बसेसची संख्या ६८ च्या वर आहे. वास्तविक, या बसेस मोडित काढून नवीन बसेस रूजू करणे गरजेचे आहे; पण भंगार बसेसद्वारे प्रवाशांना सेवा दिली जात असल्याचे दिसते. प्रत्येक वर्षी राज्य परिवहन महामंडळाकडून नवीन बसेसची खरेदी केली जात होती; पण दहा महिन्यांपासून खरेदी बंद आहे. यामुळे जिल्ह्याला एकही नवीन बस मिळालेली नाही. नवीन बससाठी प्रस्ताव पाठविला आहे; पण खरेदीच बंद असल्याने जुन्याच बसेस प्रवाशांच्या सेवेत रूजू आहेत.- अविनाश राजगुरे, प्रभारी, विभाग नियंत्रक, रापम, वर्धा.