शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

आमचे दुकान बंद झाले - तुमचे होऊ देऊ नका!

By admin | Updated: August 5, 2014 01:08 IST

लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे

मुत्तेमवार, वासनिकांचा मुख्यमंत्र्यांवर रोख : कडेवर बसलेल्यांना तिकीट देऊ नकानागपूर : लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे बंद होऊ देऊ नका. वेळीच जागे व्हा. आतापासून कामाला लागा. लोकसंपर्क असलेल्या व ‘इलेक्टिव्ह मेरिट’असलेल्यांना उमेदवारी द्या, कडेवर बसलेल्यांना तिकीट देऊ नका. तरच आमदार वाढतील व तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, अशा शब्दात माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक यांच्यासह जुन्याजाणत्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. काँग्रेसचा विदर्भ विभागीय मेळावा वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. मेळाव्यात नेत्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडत राज्य सरकारला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री मेळाव्यात उशिरा पोहोचले. त्यांच्या पूर्वी जुन्याजाणत्या नेत्यांनी आपल्यासह काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यावर कसा अन्याय होत आहे, याचा पाढा वाचला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुत्तेमवार, वासनिक, पालकमंत्री नितीन राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली. मुत्तेमवार म्हणाले, राज्यात फक्त दोनच नाव समोर येतात. मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे; ‘हम दो और हमीच दो’ असे सुरू आहे. आमची हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्ली काबीज केली, आता त्यांना आर्थिक राजधानी मुंबई काबीज करायची आहे, हे ध्यानात ठेवा. लोक म्हणतात, मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत. पण आपले पंतप्रधानही प्रामाणिक होते. निकालात काय झाले? याचा विचार करा. त्यामुळे आता तिकीट देताना जवळचा, दूरचा असे लाड करू नका, कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुकुल वासनिक म्हणाले, नेत्यांमध्ये पराभवाची खंत दिसत नाही. असे बोलले जाते की, काही मंत्री मुख्यमंत्र्यांपासून दूर आहेत. काही आमदार मंत्र्यांपासून दूर आहेत. ही परिस्थिती सुधारली नाही तर वेळ हातून जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. पक्षातील व शासकीय पदे लोकसभा व विधानसभा लढलेल्या उमेदवारांच्या शिफारशीनेच दिले जातात. असेच होत राहिले तर नवे कार्यकर्ते कसे जुळतील. लोकसभेच्या पराभवाची अनेक कारणे असली तरी, कार्यकर्त्यांना शासनात भागीदारी मिळाली नाही, हे देखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, कठीण परिस्थितीत विदर्भ नेहमी काँग्रेसला साथ देतो. मात्र, नेत्यांनी विदर्भाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. विदर्भातील कार्यकर्त्यांचा शासनदरबारी सन्मान व्हावा. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा सन्मान करा, असेही ते म्हणाले. विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतरही नेत्यांनी सामान्यासारखे वागले पाहिजे. सहज उपलब्ध होणारी लीडरशिप हवी. नाराजीतून बाहेर गेलेली माणसे जवळ आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आ. हरिभाऊ राठोड म्हणाले, राज्य सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय आता समोर येत आहेत.मेघेंविरोधात नाराजीचा सूरमेळाव्यात माजी खा. दत्ता मेघे यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. वसंत पुरके म्हणाले, काही लोक पदाशिवाय जगू शकत नाही. सुरुवात काँग्रेसपासून झाली. राष्ट्रवादीत गेले. पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता भाजपमध्ये गेले. अशा नेत्यांचा हिशेब करा, असे आवाहन त्यांनी केले. विलास मुत्तेमवार यांनीही मेघेंवर नेम साधला. काँग्रेसने मेघेंना सर्वकाही दिले तरी भाजपात गेले. आता तिकडेही वाईट गत आहे, अशी टीका त्यांनी केली.