शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन् आमचा ऊर अभिमानाने भरून आला

By admin | Updated: September 11, 2015 03:17 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लक्षावधी दलित, शोषित पीडितांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला.

याचि देही याचि डोळा : आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या सद्गदित भावना नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लक्षावधी दलित, शोषित पीडितांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. लाखो वर्षांच्या शोषणातून त्यांची मुक्तता केली त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे आज जपान येथे अनावरण होत असताना बघून अभिमानाने ऊर भरून आला. या विश्वरत्नाच्या महान कार्याला जगाने घातलेला हा कुर्निसात आहे, अशा सद्गदित भावना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी लोकमतशी थेट जपानवरून बोलताना व्यक्त केल्या. जपानच्या कोयासन विद्यापीठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांच्यासह नागपुरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी थेट जपानवरून लोकमतशी बोलताना या कार्यक्रमाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री सुलेखा कुंभारे म्हणाल्या, जपान हे बौद्ध राष्ट्र आहे. त्यामुळे बुद्धाची भूमी असलेल्या भारताबद्दल त्यांच्या मनात पूर्वीपासूनच आदर राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीने तर जपानही भारावून गेले आहे. त्यामुळे बाबासाहेबांबद्दल जपानच्या नागरिकांमध्ये विशेष प्रेम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जग ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखतो.