शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आमचा जाहीरनामा; मालकी पट्ट्याचा कायदा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:33 IST

महाराष्ट्रातही झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी अपेक्षा शहर विकास मंचाचे संयोजक अनिल वासनिक यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्रातही झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी अपेक्षा शहर विकास मंचाचे संयोजक अनिल वासनिक यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र सरकारने शहरातील झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या घर-जमिनीचे मालकी पट्टे देण्याचे धोरण अवलंबले आहे. यासाठी शासनाने वेळोवेळी शासनादेश काढलेले आहेत. नगर विकास विभाग, गृहनिर्माण, महसूल विभागने हे शासनादेश काढलेले आहेत. शासनादेशात दुरुस्ती करून त्यांची अंमलबजावणी केली जाते. शासनादेशाच्या अधीन राहून झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे वाटप करून रजिस्ट्री करून दिली जाते. मात्र महाराष्ट्रात याबाबतचा स्वतंत्र कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यात झोपडपट्टीधारांना पट्टे वाटप वा जमीन मालकीबाबतचे वेगवेगळे कायदे आहेत. मध्य प्रदेशात पट्टा अ‍ॅक्ट १९८४ अस्तित्वात आहे. ओरिसात द. ओडिसा लॅण्ड राईट टू ड्वेलर्स अ‍ॅक्ट २०१७ अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात पट्टे वाटपाचा शासनादेश असला तरी तो सक्षम व परिपूर्ण ठरत नाही. सत्तांत्तर झाले की धोरणे बदलतात. त्यामुळे धोरणात एकरूपता नसते. याचा विचार करता महाराष्ट्रातही झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा.सर्वाधिक महसूल देणाऱ्या व्यापाऱ्यांचा विचार व्हावानिवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष गरीब, सामान्य, शेतकऱ्यांचा विचार करतात आणि व्यापाऱ्यांकडे कानाडोळा करतात. पण यावर्षीच्या निवडणुकीत देशात सर्वाधिक रोजगार आणि शासनाच्या तिजोरीत महसूल देणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात समावेश करावा असे मत चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्टी अ‍ॅण्ड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.व्यापाऱ्यांचे हित जोपासताना राजकीय पक्षांनी भारतात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊ नये. विदेशात २ ते ३ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, पण देशात १२ ते १५ टक्के कर्ज घेऊन व्यवसाय करावा लागतो. या तफावतीमुळे देशातील व्यापाऱ्यांचा विदेशी कंपन्यांचा स्पर्धेत टिकाव लागत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना बँकांकडून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा जाहीरनाम्यात असावी.सहजसोपा व्यवसाय आणि मेक इंडियाची गोष्ट होते तेव्हा राजकीय पक्षांनी छोट्या व्यापाऱ्यांना स्कीम देण्याची घोषणा करावी. उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या भरवशावर विकासाची गोष्ट करणाऱ्या राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. जीएसटीचा करटप्पा कमी करून करप्रक्रिया सरळसोपी करावी. मासिक रिटर्नच्या झंझटीपासून व्यापाऱ्यांना मुक्तता द्यावी. एक देश, एक कर, यानुसार व्यापाऱ्यांवर अन्य करांचा भार टाकू नये. त्यामुळे जटील प्रक्रिया दूर होईल. व्यापाऱ्यांवरील जुन्या व्हॅटचा भार कमी करून सर्व व्यापाऱ्यांना जीएसटीच्या प्रक्रियेत आणण्याची घोषणा राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात करावी. उद्योजक आणि व्यापारी सर्वाधिक कर भरणारा देशाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा कडेलोट होणार नाही, यावर सर्वच राजकीय पक्षांनी कटाक्षाने भर देण्यावर लक्ष केंद्रित करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक