शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आमचा जाहीरनामा; सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी लहान उद्योगांना योजना जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:29 IST

यंदाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सर्वच राजकीय पक्षांनी देशाच्या सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी लघुउद्योगांना कमी व्याजदरात बँकांतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आणि सवलतीच्या योजना जाहीर कराव्यात असे मत एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात बँकांचे कर्ज मोठ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात मिळते. पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लाखो लघुउद्योजकांना बँकांमध्ये कर्जासाठी फेऱ्या माराव्या लागतात. पण यंदाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सर्वच राजकीय पक्षांनी देशाच्या सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी लघुउद्योगांना कमी व्याजदरात बँकांतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आणि सवलतीच्या योजना जाहीर कराव्यात असे मत एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर यांनी व्यक्त केले आहे. मोठे उद्योजक कर्ज बुडवून देशाबाहेर पलायन करतात. याउलट लहान उद्योगांचे कर्ज थकीत असेल तर त्याचे घर आणि कारखाना विकून कर्ज वसूल करण्यात येते. लहान उद्योजक कधीही कर्ज बुडवत नाही. कमी व्याजदरात कर्ज दिले तर लघुउद्योगांची भरभराट होईल आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि जीडीपी वाढेल. कामगार कायद्यात शिथिलता आणण्याची घोषणा जाहीरनाम्यात करावी. विजेचे दर सर्वात मोठा मुद्दा आहे. देशात लघुउद्योगांसाठी विजेचे दर समान असावेत. त्यामुळे त्यांना देशविदेशातील स्पर्धेत सक्षमतेने उभे राहता येईल. याकरिता राजकीय पक्षांनी लघुउद्योजकांच्या पाठिशी खंबीरतेने उभे राहिले पाहिजे. विजेचे दर समान राहिल्यास उद्योजकांना देशाच्या कोणत्याही भागात उद्योग उभारता येईल. त्यामुळे त्या क्षेत्राचा विकास विकास आणि रोजगार निर्मिती होईल. वीज दरात तफावत असल्यामुळे बुटीबोरी, हिंगणा असो वा मिहान, सेझ या भागात अपेक्षेनुसार उद्योग आले नाहीत. समान वीजदराचा उल्लेख जाहीरनाम्यात करावा. लघुउद्योगासाठी जीएसटीचे दर १२ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. सध्याच्या १८ टक्क्यांच्या कर टप्प्यामुळे अनेक कंपन्या बंद झाल्या असून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. लघुउद्योगांसाठी विशेष धोरणांचा समावेश असलेला जाहीरनामा राजकीय पक्षांनी जाहीर करावा असे ते पुढे म्हणतात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक