शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

-तर उमेदवारांची संधी हुकणार

By admin | Updated: February 1, 2017 02:23 IST

मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे तीन दिवस हे उमेदवारांसोबतच प्रशासनासाठीदेखील

आॅनलाईन’ची भीती : संकेतस्थळ ‘हँग’ झाल्यास होणार धावाधाव नागपूर : मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे तीन दिवस हे उमेदवारांसोबतच प्रशासनासाठीदेखील धावपळीचे ठरणार आहेत. या कालावधीत हजारो उमेदवार ‘आॅनलाईन’ नोंदणी करणार आहेत. पहिल्या दिवसाचा अनुभव पाहता अचानक अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढीस लागल्यावर संकेतस्थळ ‘हँग’ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऐनवेळी असे झाले तर उमेदवारांची अर्ज भरण्याची संधीच हुकण्याची शक्यता आहे. यंदाच्या मनपा निवडणूकांत उमेदवारांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर शुक्रवारी सकाळी ११ पासून आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली व ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवार ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करू शकणार आहे. मंगळवारपर्यंत ९८८ इच्छुक उमेदवारांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी केली. भाजपा, कॉंग्रेससह बहुतांश पक्षांनी अद्यापही उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेकांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. उमेदवार यादी जाहीर होण्याची किंवा ‘एबी फॉर्म’ मिळण्याची प्रतीक्षा न करता अनेक इच्छुक बुधवारपासून ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करतील. अशा स्थितीत संकेतस्थळ ‘हँग’ होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर उमेदवारांसमोर ऐनवेळी मोठा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तज्ज्ञ म्हणतात, होऊ शकते ‘हँग’ अचानक संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली तर नक्कीच ‘सर्व्हर’वर ‘लोड’ वाढू शकते. जर तांत्रिकदृष्ट्या यासंदर्भात काळजी घेतली नसेल तर संकेतस्थळ ‘हँग’ होऊ शकते. पहिल्या दिवसाचा अनुभव लक्षात घेता संकेतस्थळात सुधारणा होणे अपेक्षित आहे, असे मत संगणकतज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले. पहिल्या दिवशीच बसला होता फटका अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तांत्रिक दोष निर्माण झाला होता. नगरसेवकांची कार्यालये, पक्षांची कार्यालये, इंटरनेट कॅफे, व्यक्तिगत लॅपटॉपवरही तासन्तास प्रयत्न करूनही अर्ज भरण्याची प्रकिया पूर्ण होऊ शकली नाही. सुरुवातीपासूनच वेबसाईटमध्ये तांत्रिक दोष दिसून आला. दिवसभर प्रयत्न करूनही यश न आल्यामुळे त्रस्त झालेल्यांनी महापालिकेतील निवडणूक विभागाचे कार्यालय गाठून तक्रारदेखील केली.